IND vs AUS : इंडिया-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजआधी टीमला झटका, स्टार खेळाडूला दुखापत
GH News September 28, 2024 01:07 AM

टीम इंडिया सध्या मायदेशात बांगलादेश विरुद्ध कसोटी मालितकेतील दुसरा आणि अंतिम सामना खेळत आहे. टीम इंडिया सलग दुसरा सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-205 च्या साखळीतील फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याच्या तयारीत आहे. टीम इंडिया काही दिवसांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रतिष्ठेची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी एक वाईट बातमी आली आहे. ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागला आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन याला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीआधी दुखापत झाली आहे. त्यामुळे ग्रीनला दुखापतीमुळे बीजीटी (बॉर्डर गावस्कर ट्रॉफी) मालिकेतून बाहेर पडण्याचा धोका आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. कॅमरुनला या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दुखापत झाली होती. कॅमरुनला या कंबरेच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडावं लागलं आहे.

टीम इंडिया 2024 च्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्यांदाच बीजीटी अंतर्गत 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ग्रीनला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची असेल, तर त्याला बीजीटीतून बाहेर व्हावं लागू शकतं. तर सध्या ग्रीन वनडे सीरिजमधून बाहेर झाल्याने इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला धक्का लागला आहे. ऑस्ट्रेलिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.

कॅमरुन ग्रीनला दुखापत, ऑस्ट्रेलियाला डोकेदुखी

ग्रीनची कामगिरी

दरम्यान कॅमरुन ग्रीन याने इंग्लंड विरूद्धच्या अखेरच्या सामन्यात 42 धावांची खेळी केली होती. तसेच 45 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या होत्या. तर या मालिकेतील पहिल्या सामन्यात 32 धावा केल्या होत्या.

रिकी पॉन्टिंग काय म्हणाला?

दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने कॅमरुन ग्रीनच्या दुखापतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला कॅमेरुनच्या दुखापतीबाबत माहित आहे. कॅमेरुनला याआधीही पाठीच्या दुखापतीचा त्रास झाला होता. परिस्थिती फार अगदीच वाईट नसली तर कॅमरुन बॅट्समन म्हणून खेळू शकतो, असं पॉन्टिंगने म्हटलं. आता ग्रीन बीजीटी मालिकेआधी कमबॅक करतो का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.