MU Senate Election: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचा झेंडा; ठाकरे गटाचे 8 उमेदवार विजयी
Times Now Marathi September 28, 2024 02:45 AM

Mumbai University Senate Election: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाने बाजी मारली आहे. 10 पैकी 7 जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर उर्वरीत तीन जागांवरवर देखील युवासेनेचेच उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. या सिनेट निवडणुकीसाठी 24 सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आज मतमोजणी सुरु असून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.

सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेने विजयी आघाडी घेतली असून राखीव गटातील 5 उमेदवारांचा विजय झाला आहे, तसेच इतर दोन उमेदवार देखील विजयी झाल्याची माहिती समोर येत आहे. अजून मतमोजणी सुरु असून थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होईल.

विजयी उमेदवारांची नवे
  • स्नेहा गवळी-महिला राखीव
  • मयुर पांचाळ-इतर मागसवर्ग
  • शीतल देवरुखकर-अनुसूचित जाती
  • धनराज कोहचाडे-अनुसूचित जमाती
  • शशिकांत झारे

  • © Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.