दुर्गापूजा महोत्सव ८ ऑक्टोबरपासून
esakal September 28, 2024 03:45 AM

पुणे, ता. २७ : आधुनिक संकल्पना आणि पारंपरिकता यांचा अनोखा मिलाफ साधत विविध भारतीय सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विविध समाजातील नागरिकांना एकत्र आणणाऱ्या सप्तपदी कल्चरल ॲण्ड स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे ‘सप्तपदी दुर्गापूजा महोत्सवा’चे आयोजन केले आहे. हा महोत्सव बालेवाडी हायस्ट्रीट येथील साफा बँक्वेटस येथे ८ ते १३ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे.
या पाचदिवसीय महोत्सवात दैनंदिन दुर्गापूजा विधीबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक बंगाली फूड फेस्टिव्हलचा समावेश असेल.
असोसिएशनचे अध्यक्ष संजय बिस्वास म्हणाले की, दुर्गामातेची राजवाडी पद्धतीची भव्य मूर्ती हे या उत्सवाचे खास आकर्षण आहे. उत्सवाबाबत अधिक माहिती देताना खजिनदार राज भनोट म्हणाले की, सप्तपदी दुर्गापूजा महोत्सवामध्ये ८ ऑक्टोबरला मायर बोधोन होणार आहे. ९ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता दुर्गापूजेला प्रारंभ होईल. तसेच, आनंद मेळा, पारंपरिक बंगाली भोग आणि फूड फेस्टिव्हलचेही आयोजन केले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.