Devendra Fadnavis ministry office vandalized by unidentified woman rrp
Marathi September 28, 2024 05:25 AM


राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सचिवांसाठी असलेल्या गेटमधून संबंधित महिलेने पास न काढता मंत्रालयात प्रवेश केला. यानंतर तिने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आणि मंत्रालयातून निघून गेली.

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सचिवांसाठी असलेल्या गेटमधून संबंधित महिलेने पास न काढता मंत्रालयात प्रवेश केला. यानंतर तिने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आणि मंत्रालयातून निघून गेली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पोलिसांकडून संबंधित महिलेचा शोध सुरू केला आहे. (Devendra Fadnavis ministry office vandalized by unidentified woman)

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला गुरुवारी (26 सप्टेंबर) रोजी संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी मंत्रालयाच्या परिसरात फारसा पोलीस बंदोबस्त नसल्याचा फायदा घेत सचिवांच्या गेटने सहजपणे आतमध्ये शिरली. यानंतर ती सहाव्या मजल्यावर असणाऱ्या फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर गेली आणि त्याठिकाणी तिने तोडफोड केली. महिलेने कार्यालयाबाहेरील फडणवीसांची नेमप्लेट काढून फेकली आणि घोषणाबाजी केली. त्यानंतर ती तिथून निघून गेली. याप्रकरणी फडणवीसांच्या कार्यलयाकडून तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

– Advertisement –

हेही वाचा – NCP : आधी कॅबिनेट मंत्रीपद नाकारलं, आता अजित पवार गटाला केंद्रात मिळाली मोठी जबाबदारी

या घटनेचे सीसीटीव्ही समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी सध्या या घटनेचा तपास सुरू केला आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. मात्र संबंधित महिला मंत्रालयात घुसल्याने तेथील सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. ही महिला कोण होती, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण तिने पास नसतानाही मंत्रालयात प्रवेश कसा केला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

– Advertisement –

भाजपाला चिंता, तर विरोधकांचे टीकास्त्र

दरम्यान, मंत्रालयातील देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय फोडल्यानंतर भाजपा नेते प्रवीण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी चिंता व्यक्त करत पोलीस तपासात सगळ्या गोष्टी समोर येतील, असे म्हटले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस हे स्वत:ला आधुनिक काळातील अभिमन्यू म्हणवून घेतात. पण त्यांना जवळच्याच लोकांपासून धोका आहे का? हे त्यांनी एकदा तपासून पाहावे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Politics : चक्रव्यूहमध्ये योद्धे अडकतात, बेईमान नाही; राऊतांची फडणवीसांवर सडकून टीका


Edited By Rohit Patil



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.