नागपूर विमानतळावर उद्धव ठाकरे-राणे समर्थक आमने-सामने; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी, मालवणचा हिशेब नागपुरात चुकता?
तुषार कोहळे September 29, 2024 05:13 PM

Maharashtra Politics नागपूर : राज्याच्या राजकारणात कायम एकमेकांवर टीका करत लक्ष्य करणारे भाजपचे नेते, आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि शिवसेना उबाठा गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज नागपुरात येथे येत आहे. या दोन्ही नेत्यांच्या आगमनासाठी नागपूर (Nagpur  Airport ) विमानतळावर त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळाले. दरम्यान, यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्याकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी कारण्यात आली आहे.

परिणामी, विमानतळ परिसर दोन्ही गटाच्या घोषणाबाजीने दणाणून गेला होता. या एकंदरीत गोंधळाच्या परिस्थतीवर पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांना शांत राहण्याचे आवाहन केलं. मात्र, पोलिसांच्या या प्रयत्नांना फार यश न आल्याचे बघायला मिळाले आहे. एकुणात राज्याच्या राजकीय आखाड्यात एकमेकांवर टीका करण्याची कुठलीही संधी न सोडणारे दोन दिग्गज नेते आज नागपुरात (Nagpur News) येत असल्याने कार्यकर्ते देखील एकमेकांविरोधात घोषणाबाजी करताना दिसून आले आहे. सध्या नागपूर विमानतळावर तनावपूर्ण शांतात असल्याचीही माहिती आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांची वाट अडवण्याचा जो प्रकार घडला होता, त्याचा हिशेब नागपुरात चुकता झालाय का? अशी चर्चा या निमित्याने होते आहे. 

नेमकं काय घडलं? 

नागपूर विमानतळावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या  शिवसैनिकांनी भाजप नेते नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. नितेश राणे हे परतवाडा येथे हिंदू आक्रोश सभेला जाण्यासाठी नागपूर विमानतलवार उतरले, त्याच वेळी शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी विमानतळावर होते. शिवसैनिकांना जेव्हा कळले कि नितेश राणे यांना दुसऱ्या गेट ने बाहेर पडत आहे . तेव्हा उबाठा चे शिवसैनिक आगमन गेट वर गेलेले आणि त्यांनी नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. परिस्थितीचे गांभीर्य बघता पोलिसांनी शिवसैनिकांना परत प्रस्थान गेट वर पाठवले. त्यानंतर नितेश राणे यांना रास्ता मोकळा करून देत पोलिसांनी परतवाडाकडे रवाना केलंय. मात्र काही वेळासाठी नागपूर विमानतलवार तणावाची स्थिती निर्माण झाली होती

नितेश राणे हिंदू जण आक्रोश सभेसाठी आज अमरावतीत    

भाजप नेते नितेश राणे हे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज जिल्ह्याच्या अचलपूर-परतवाडा या ठिकाणी सकल हिंदू समाजाचा जण आक्रोश भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, नितेश राणे यांच्या या दौऱ्याला आधीपासूनच विरोधाची किनार असल्याची माहिती आहे. मुस्लिम समुदायाने या दौऱ्याला विरोध दर्शवला होता. प्रथम पोलीसांनी बाईक रॅली, सभेची परवानगी नाकारत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कलम 163 बी एन एस एस लागू केली होती. मात्र रॅलीचा मार्ग बदलला आणि जिल्हाधिकारी यांनी सकाळी काढलेला आदेश रात्री मागे घेतला. तसेच नितेश राणे यांच्या बाईक रॅली आणि सभेलाही पोलिसांची परवानगी दिली. त्या पार्श्वभूमीवर अचलपूर मध्ये आज मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नितेश राणे हे आज नागपूर येथून दुपारी अचलपूर- परतवाडाकडे प्रयाण करणार आहेत. तर सायंकाळी ४ वाजता सकल हिंदू समाजाच्या मोर्चात राणे सामील होणार आहे. परतवाडा कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये नितेश राणेंची सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जाहीर सभाही आहे. मात्र त्यापूर्वीच ठाकरे आणि राणे समर्थक आमने-सामने आल्याने हा दौरा चर्चेत आला आहे.

आमचा जोश काय असतो, हे शिवसैनिकांनी दाखवून दिलं- भास्कर जाधव

तर दुसरीकडे या प्रकरणावर भाष्य करत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाष्य करत नितेश राणेंवर टीका केली आहे. हे सगळे  शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट ईथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला त्यावेळी आदित्य ठाकरे गेले होते. त्यावेळी शिवाजी महाराजांचा पुतळा यांच्यामुळे पडला, यांच्या सरकारमुळे पडला, त्याची लाज बाळगाण्या ऐवजी यांनी आदित्य ठाकरे यांचा रस्ता रोखून धरला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे यांना दुसऱ्या रस्त्याने जायला सांगा, असे सांगण्यात आले. मात्र आदित्य ठाकरे यांनी त्यावेळी रस्ता बदलला नाही. आज आमचा जोश काय असतो, हे शिवसैनिकांनी दाखवून दिलं असल्याची प्रतिक्रिया आमदार भास्कर जाधव यांनी दिली. 

हे ही वाचा 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.