प्रसिद्ध अभिनेत्यावर कर्जाचा डोंगर, मुलाच्या शाळेबाहेर भाजी विकण्याची वेळ; सांगितली 'त्या' संघर्षमय दिवसांची कहाणी
स्नेहल पावनाक September 29, 2024 05:13 PM

Entertainment News : फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव आणि पैसा कमावणं फार कठीण आहे. काही कलाकारांना पहिल्याच प्रोजेक्टमध्ये स्टारडम मिळतं, पण काहींच्या बाबतीत इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळण्यात आयुष्य निधून जातं. अनेक कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर असतात, मात्र नंतर त्यांच्यावर फार वाईट परिस्थिती ओढवते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत. या अभिनेत्यावर कर्जाचा डोंगर झाला होता, त्यावेळी त्याच्यावर मुलाच्या शाळेबाहेर भाजी विकण्याची वेळ आली होती. ही संघर्षमय कहाणी वाचा.

प्रसिद्धीच्या शिखरावर असताना इंडस्ट्री सोडली

अभिनेता आणि प्रोड्युसर राजेश कुमार याच्यावर एकवेळ अशी होती की, कर्जाचा डोंगर झाला होता आणि कर्ज चुकवण्यासाठी मिळेल, ते काम करावं लागत होतं. अभिनेता  राजेश कुमार साराभाई व्हर्सेस साराभाई, यम किसी से कम नहीं, नीली छत्री वाले आणि ये मेरी फॅमिली या मालिकांमधील खास भूमिकांसाठी ओळखला जातो. पण करियरच्या शिखरावर असताना राजेशने अभिनय सोडण्याच्या निर्णय घेतला ज्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. यानंतर त्याच्या आयुष्यातही मोठी उलथापालथ झाली.

अभिनय सोडून शेती करण्याचा मोठा निर्णय

अभिनेता राजेश कुमार याने 2017 मध्ये करियरच्या पिक पॉईंटवर असताना इंडस्ट्रीला रामराम करण्याचा मोठा निर्णय घेतला. आपण येणाऱ्या पिढीसाठी काय करतोय? या प्रश्नाने त्याला हैराण केलं होतं. म्हणूनच त्याने प्रसिद्धीपासून दूर राहून शेती करण्याचा निर्णय घेतला. पण, शेती करण्याचा निर्णय त्याच्यासाठी खूपच आव्हानात्मक ठरला. राजेश कुमार सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.

अभिनेत्याने सांगितली 'त्या' संघर्षमय दिवसांची कहाणी

या अभिनेत्याने शेती व्यवसाय सुरू करताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला हे सांगितले. 'फॅमिली फार्मर' ही संकल्पना सुरू केल्याचे राजेशने सांगितले. मी माझ्या मित्रांना या कल्पनेबद्दल सांगितले, त्यापैकी काहींनी माझ्याशी सहमती दर्शविली आणि काहींनी त्यापासून दूर गेले. मला वाह, काय छान कल्पना सांगणाऱ्या लोकांची एक लांबलचक यादी होती पण नंतर त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले. हे असे लोक होते ज्यांच्यासोबत मी टीव्हीवर काम केले होते.

मुलाच्या शाळेबाहेर भाजी विकली

राजेश म्हणाला की, 'स्टार्टअप अयशस्वी झाल्यानंतर मी माझ्या मुलाच्या शाळेबाहेर भाजीपाला विकायला सुरुवात केली. मला पाहून लोक म्हणायचे की मी वेडा झालोय. माझा मुलगा वेगवेगळ्या वर्गात जाऊन मी भाजी विकतो असे सांगू लागला आणि शिक्षकांना माझ्याकडून भाजी विकत घेण्याची विनंती करू लागला.

दोन कोटी रुपयांचं कर्ज

राजेशने सांगितलं की की, मी हे 10 वर्षे केले आणि माझ्यावर 2 कोटी रुपयांचे कर्ज झालं. माझे गणित खूप कच्चं होतं. मला किलोमागे 22 ते 25 रुपयांचे नुकसान होत आहे, हे माझ्या लक्षात आलं नाही. त्यामुळे माझे सुमारे 12 ते 15 लाख रुपयांचं नुकसान झालं. ऑर्डर्स मॅनेज करण्यासाठी मी ॲप बनवण्याचा विचार केला, पण ॲप बनवणाऱ्या व्यक्तीनेही माझी फसवणूक केली. शेवटी मला माझं स्टार्टअप बंद करावं लागलं. 

कोटा फॅक्टरी 2 सह पुनरागमन केले

स्टार्टअप बंद केल्यानंतर मला माझ्या सर्व मित्रांना आणि माझ्याशी संबंधित असलेल्या शेतकऱ्यांना उत्तर द्यावं लागलं. कर्ज फेडण्यासाठी पुन्हा अभिनयाकडे वळण्याच निर्णय घेतला. यानंतर राजेश कुमारने जितेंद्र कुमारच्या कोटा फॅक्टरी 2 वेब सीरीजमधून पुनरागमन केलं, जिथे त्याने गणिताच्या शिक्षकाची भूमिका केली. अभिनेता राजेश कुमार शाहिद कपूरच्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' आणि नवाजुद्दीन सिद्दीकी 'स्टारर रौथु का राज' चित्रपटामध्येही दिसला.

Bhumi Pednekar : भूमीनं हे घातलंय काय? 'नागिण' स्टाईल अतरंगी फॅशन पाहून नेटकऱ्यांनी काढली उर्फीची आठवण, सोशल मीडियावर ट्रोल

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.