ENG vs AUS 5th Odi: ऑस्ट्रेलियाने कॅप्टन बदलला, निर्णायक सामन्यात इंग्लंडची बॅटिंग
GH News September 29, 2024 07:10 PM

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील पाचवा आणि शेवटचा सामना हा काउंटी ग्राउंड, ब्रिस्टोल येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. कॅप्टन स्टीव्हन स्मिथ याने फिल्डिंगचा निर्णय घेत इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी या निर्णायक सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. या सामन्यासाठी एकूण 4 बदल करण्यात आले आहेत. इंग्लंडने 1 बदल केला आहे. तर ऑस्ट्रेलियाने कॅप्टनसह 3 बदल केले आहेत. तर एकाला पदार्पणाची संधी मिळाली आहे.

ऑस्टलियाकडून मॅथ्यू शॉर्ट, आरोन हार्डी आणि कूपर कोनोली या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. कूपर कोनोली याचं पदार्पण झालं आहे. तर मिचेल मार्श याच्या नेतृत्वात स्टीव्हन स्मिथ नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय. तर मिचेल मार्श, एलेक्स कॅरी आणि सीन एबोट या तिघांना बाहेर करण्यात आलं आहे. तर इंग्लंडने 1 बदल केलाय. जोफ्रा आर्चर याच्या जागी ओली स्टोन याचा समावेश करण्यात आला आहे.

निर्णायक सामना

दरम्यान 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलियाने पहिले सलग 2 सामने जिंकून आघाडी घेतली. त्यानंतर यजमान इंग्लंडने कमबॅक करत सलग 2 सामने जिंकत मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे आता पाचव्या सामन्यात रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

इंग्लंड एक बदलासह मैदानात

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : हॅरी ब्रूक (कॅप्टन), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी स्मिथ (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, मॅथ्यू पॉट्स, ऑली स्टोन आणि आदिल रशीद.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, कूपर कोनोली, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.