बीडमध्ये मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या, हिंदकेसरी नामंकित बैल जोड्यांचा थरार
GH News September 29, 2024 07:10 PM

पश्चिम महाराष्ट्राच्या धरतीवर बीडमध्ये भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. बीड जवळील तळेगाव शिवारात तीनशे मीटर धावपट्टीवर बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी मात्र राजकारणाची किनार शर्यतीला दिसून आली. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर प्रत्येक वर्षी पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर बीडमध्ये बैलगाडा शर्यत आयोजित केली जाते. यावर्षी बहुचर्चित मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीत महाराष्ट्रातील नामांकित बैल बकासूर, सर्जा, सोन्या, हिंदकेसरी यासारख्या बैल जोड्यांचा थरार पाहायला मिळाला. त्यामुळे नामांकित बैल जोड्यांचा थरार स्थानिकांना पाहायला मिळणार असल्याचे त्यांच्यात उत्साहाचे वातावरण होते. याच बैलगाडा शर्यतीतून भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.