SL vs NZ : श्रीलंकेची विजयानंतर WTC Points Table मोठी झेप, टीम इंडियाला किती धोका?
GH News September 29, 2024 09:10 PM

श्रीलंका क्रिकेट टीमने रविवारी 29 सप्टेंबर रोजी न्यूझीलंडवर दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी 1 डाव आणि 154 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. श्रीलंकेने या विजयासह 2-0 अशा फरकाने मालिकेवर नाव कोरलं. श्रीलंकेच्या या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप साखळीच्या पॉइंट्स टेबलमध्ये पूर्णपणे बदल झाला आहे. श्रीलंकेने सलग 2 विजयांसह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे आणि श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाच्या पॉइंट्समध्ये थोडाच फरक राहिला आहे.

श्रीलंकेची तिसऱ्या स्थानी झेप

श्रीलंकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळीत आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. श्रीलंकेने या 9 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या विजयी टक्केवारीत वाढ झाली आहे. श्रीलंकेची विजयी टक्केवारी ही या सामन्याआधी 50 इतकी होती, जी आता 55.55 इतकी झाली आहे. तर न्यूझीलंडची 3 स्थानांनी घसरण झाली आहे. न्यूझीलंड थेट चौथ्या स्थानावरुन सातव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. आठव्या आणि नवव्या स्थानी पाकिस्तान-वेस्ट इंडिज आहेत. तर इंग्लंड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत.

टीम इंडिया नंबर 1

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. टीम इंडियाची विजयी टक्केवारी ही 71.67 इतकी आहे. तर ऑस्ट्रेलियाची टक्केवारी ही 62.50 अशी आहे. टीम इंडिया-बांगलदेश यांच्यातील दुसऱ्या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिल्यास टीम इंडियाच्या टक्केवारीत घट होईल परिणामी नुकसान होईल. तसं झाल्यास टीम इंडियाची टक्केवारी 68.18 अशी होऊ शकते.

दरम्यान दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत खेळायचं आहे. ऑस्ट्रेलियासाठी या दोन्ही मालिका आव्हानात्मक असणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा या 2 पैकी एकही मालिकेत पराभव झाला, तर अंतिम फेरीत पोहचण्याचा मार्ग खडतर होईल हे नक्की.

श्रीलंकेची मोठी झेप

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टीम साऊथी (कॅप्टन) टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडीस (विकेटकीपर), मिलन प्रियनाथ रथनायके, प्रभाथ जयसूर्या, निशान पेरिस आणि असिथा फर्नांडो

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.