ENG vs AUS: डकेटचं शतक-ब्रूकचं अर्धशतक, ऑस्ट्रेलियाला मालिका विजयासाठी 310 धावांचं आव्हान
GH News September 29, 2024 11:09 PM

इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 310 धावांचं आव्हान दिलं आहे. इंग्लंडने 49.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट 309 धावा केल्या. इंग्लंडकडून ओपनर बेन डकेट याने सर्वाधिक 107 धावा केल्या. तर कर्णधार हॅरी ब्रूकने अर्धशतकी खेळी केली. आदील रशीदने 36 धावांची खेळी केली. ओपनर फिलीप सॉल्ट आणि जेकब बेथल या दोघांनी दुहेरी आकडा गाठला. विल जॅक्स आणि चौथ्या सामन्यात मिचेल स्टार्कची धुलाई करणाऱ्या लियाम लिविंगस्टोन या दोघांना भोपाळाही फोडता आला नाही. ओली स्टोन 9 धावांवर नाबाद परतला. तर तिघांना 9 पेक्षा अधिक धावांचं योगदान देता आलं नाही.

बेन डकेट याने 91 बॉलमध्ये 107 रन्स केल्या. हॅरी ब्रूकने 72 धावांचं योगदान दिलं. फिलीप सॉल्ट याचं अर्धशतक अवघ्या 5 धावांनी हुकलं. सॉल्ट 45 धावा करुन बाद झाला. आदिलने 35 चेंडूत 4 चौकारांसह 36 धावा केल्या. जेकब बेथलने 13 धावांची भर घातली. जेमी स्मिथ आणि मॅथ्यू पॉट्स या दोघांनी प्रत्येकी 6-6 धावा केल्या. तर ब्रायडन कार्सने 9 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

ऑस्ट्रेलियाकडून चक्क ट्रेव्हिस हेड याने 4 विकेट्स घेतल्या. तर तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. आरोन हार्डी, एडम झॅम्पा आणि ग्लेन मॅक्सवेल या तिघांनी प्रत्येकी दोघांना आऊट करत इंग्लंडला ऑलआऊट करण्यात निर्णायक भूमिका बजावली.

कोण जिंकणार मालिका?

दरम्यान 5 सामन्यांची मालिका ही 2-2 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडे विजय मिळवून मालिका जिंकण्याची समसमान संधी आहे. आता या पाचव्या सामन्यासह मालिका कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलियासमोर 310 धावांचं आव्हान

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : हॅरी ब्रूक (कॅप्टन), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी स्मिथ (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, मॅथ्यू पॉट्स, ऑली स्टोन आणि आदिल रशीद.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, कूपर कोनोली, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.