पितृपक्ष निमित्त किराणा वाटप
esakal September 30, 2024 12:45 AM

पितृपक्षानिमित्त किराणा वाटप
मालाड, ता. २९ (बातमीदार) ः जोगेश्वरी पूर्वेतील अरविंद गंडभीर शाळेतील माजी विद्यार्थी किरण वैद्य, मुकेश नायक, हरिहर शिंदे, गणेश हिरवे या चौघांनी एकत्र येऊन पितृ पंधरवड्यानिमित्त विभागातील २० गोरगरीब, वंचित आणि सफाई कामगारांना किराणा किट दिले. माजी विद्यार्थी एकत्र येऊन दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. आपल्या उत्पन्नातील काही भाग हा समाजातील दुर्बल घटकांसाठी वापरता यायला हवा, असे आयोजकांनी सांगितले. तसेच, यापुढेही समाजासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून काय चांगले करता येईल, यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.