Latest Maharashtra News Live Updates: पुण्यात काचाच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू
esakal September 30, 2024 12:45 AM
Pune Accident Live : पुण्यात काचाच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू

कोंढवा, ता. २९: येवलेवाडीतील एका काचाच्या कारखान्यात काचा उतरवताना पाच कामगार अडकल्याची घटना रविवारी (ता. २९) दुपारी घडली. काचा उतरवताना काचा फुटल्याने त्यामध्ये हे कामगार अडकल्याची माहिती कोंढवा अग्निशामक दलाला मिळाली असता अग्निशमन दलाच्या जवानांनी सहाही कामगारांना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले. मात्र, रुग्णालयात गेल्यावर चार कामगारांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Akshay Shinde Live : अक्षय शिंदेंचा मृतदेह उल्हानगरमध्ये दाखल; शांतीनगर स्मशानभूमीत दफनविधी

एन्काउंटरच्या सात दिवसानंतर अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर उल्हासनगर येथे शांतीनगर स्मशानभूमीत दफनविधी केला जाणार आहे. या अंत्यसंस्काराला शिवसेनेकडून विरोध करण्यात आला होता. या विरोधानंतर देखील पोलिस बंदोबस्तामध्ये हा अंत्यविधी केला जात आहे.

Akshay Shinde Live : अक्षय शिंदेंचा मृतदेह उल्हानगरकडे रवाना

बदलापुर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांच्या मृतदेहावर उल्हासनगर येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या अंत्यसंस्काराला शिवसेनेकडून विरोध करण्यात आला आहे.

Arvind Kejriwal Live Update : तुरुंगात माझा मानसिक आणि शारीरिक छळ करण्याचा प्रयत्न झाला : अरविंद केजरीवाल

"मी तुरुंगात असताना त्यांनी (भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने) माझा मानसिक आणि शारीरिक छळ करण्याचा प्रयत्न केला. मी मधुमेहाचा रुग्ण आहे, आणि मला दररोज चार इन्सुलिन इंजेक्शन्स लागतात, पण त्यांनी माझी औषधे बंद केली. त्यांना हवे होते. मला तोडण्यासाठी, पण त्यांना माहीत नाही की मी हरियाणाचा आहे, आणि तुम्ही हरियाणातील माणसाला तोडू शकत नाही," असे रेवाडी येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल म्हणाले.

Chennai Raj Bhavan Live Update : तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन राजभवनात दाखल

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन राजभवनात पोहोचले आहेत.

Delhi CM Atishi Live Update : दिल्लीच्या रस्त्यांची पाहणी आणि दुरुस्तीची घोषणा

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीच्या रस्त्यांची पाहणी आणि दुरुस्तीची घोषणा केली.

"उच्च मतदानाचा आम्हाला फायदा होईल. लोकांना बदल हवा आहे आणि ते भाजपला कंटाळले आहेत" सचिन पायलट

"उच्च मतदानाचा (टक्केवारी) आम्हाला फायदा होईल. लोकांना बदल हवा आहे आणि ते भाजपला कंटाळले आहेत.

काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणतात, "उच्च मतदानाचा (टक्केवारी) आम्हाला फायदा होईल. लोकांना बदल हवा आहे आणि ते भाजपला कंटाळले आहेत... मला विश्वास आहे की आमच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. मला निवडणुका मुद्द्यांवर घ्यायच्या आहेत. .."

Man Ki Baat Live Update: मन की बातच्या प्रवासाला १० वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी श्रोत्यांचे मानले आभार

'मन की बात' च्या प्रवासाला १० वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रोत्यांचे मानले आभार मानले आहे.

Nitesh Rane Live: नागपूर विमानतळावर नितेश राणेंविरोधात शिवसैनिकांचे घोषणाबाजी

नितेश राणे यांच्या नागपूर विमानतळावर आगमनाच्या वेळी शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. या शिवसैनिकांनी "नितेश राणे मुर्दाबाद"च्या घोषणा देत विरोध दर्शवला. राणे यांच्या आगमनाने नागपूर विमानतळावर वातावरण तंग झाले होते, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

Narendra Modi live: एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीचं चांगलं काम - नरेंद्र मोदी

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुती चांगलं काम करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Prime Minister Narendra Modi live: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन केले.

Pune Metro Live : पुणे मेट्रोचं आज मोदी करणार लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. आज दुपारी पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थितीत राहून प्रतीक्षेत असलेला जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गाचे लोकार्पण करणार आहेत.

St Bus Live: भरत गोगावलेंनी केली दिंडोरी बस्थानकाची पाहणी

एस टी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेंकडून दिंडोरी बस्थानकाची पाहणी

Shivsena live : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार?

शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदान येथे पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे.

Uddhav Thackeray live : थोड्याच वेळात उद्धव ठाकरे येणार नागपूर विमानतळावर

थोड्याच वेळात उद्धव ठाकरे येणार नागपूर विमानतळावर येणार आहेत. आज नागपूरला आल्यावर विदर्भातील सेनेचे पदाधिकरी यांच्याशी हॉटेल रेडिसन येथे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठका होती

Pandharpur : पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात स्वच्छता मोहिम

शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पासून स्वच्छता मोहिम सुरू करण्यात आली आहे. येत्या 3 आक्टोबर रोजी घटस्थापना होणार आहे.

Kolhapur bench Live: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची पाठराखण

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी पाठराखण केली आहे. कोल्हापूर खंडपीठ ही काळाची गरज आहे. राज्याच्या टोकाला राहणाऱ्या रहिवाशांना जलद आणि प्रभावी न्याय मिळवा, असं न्यायमूर्ती गवई म्हणाले. न्यायमूर्ती गवई २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनण्याच्या मार्गावर आहेत.

Pune Metro News Live: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आजपासून प्रवाशांसाठी सुरू होणार जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग

आजपासून प्रवाशांसाठी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचे लोकार्पण होणार आहे. संध्याकाळी ४ वाजता हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग आहे. या मार्गावर जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई, स्वारगेट असे ४ मेट्रो स्थानके आहेत.

कसे असणार या मार्गावरचे तिकीट दर

जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ: १० रुपये

जिल्हा न्यायालय ते मंडई: १५ रुपये

जिल्हा न्यायालय ते स्वारगेट: १५ रुपये

स्वारगेट ते मंडई: १० रुपये

स्वारगेट ते कसबा पेठ: १५ रुपये

स्वारगेट ते जिल्हा न्यायालय: १५ रुपये

Pune Bhor News Live: पुण्याच्या भोरमधील किवत गावातील पोलिस व शासकिय नोकरीत भरती झालेल्या सात जणांचा ग्रामस्थांकडून सत्कार

पुण्याच्या भोरमधील किवत गावातील पोलिस व शासकिय नोकरीत भरती झालेल्या सात जणांचा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. गावातून जंगी मिरवणूक काढून सत्कार केला गेला. मिरवणूकीत ग्रामस्थांबरोबरच महिला व तरुणींचा सहभाग होता. सात जण मोफत असलेल्या भोरमधील संकल्प अभ्यासिकेत अभ्यास करत होते.

NCP Melava Live: राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आज पुण्यात तर शरद पवार गटाचे समरजीत घाडगे मुंबईत घेणार मेळावे

राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आज पुण्यात तर शरद पवार गटाचे समरजीत घाडगे मुंबईत मेळावे घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध शहरातील आपल्या मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मेळावे सुरू आहेत. समरजीत घाडगे आज डिलाईल रोड येथे दुपारी ३ वाजता ग्रामस्थांशी संवाद साधणार, मागील रविवारी यांच ठिकाणी हसन मुश्रीफांनी मेळावा घेतला होता.

PM Modi Pune Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे करणार पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन

जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थितीत राहणार आहेत. सकाळी 11 वाजता गणेश क्रीडा मंदिर येथे या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात होणार आहे. दुपारी १२.३० ते १.०५ या दरम्यान पंतप्रधान दूरदृष्य प्रणालीद्वारे याचे उद्घाटन करणार

याच कार्यक्रमात स्वारगेट ते कात्रज या नवीन दक्षिण विस्तारित मार्गीकेचे भूमिपूजन देखील होणार आहे. २ मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटन व भूमिपूजनाबरोबर पंतप्रधान करणार सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करतील. पुण्यातील भिडेवाडा स्मारकाचे भूमिपूजन आणि बिडकीन प्रकल्पाचे राष्ट्राला समर्पण करणार आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.