कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
विलास अध्यापक, एबीपी माझा September 30, 2024 01:43 AM

Belgaum : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेतलीये. यामध्ये तिघांचा मृत्यू झालाय. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील बोमम्मनाळ गावात ही दुर्दैवी घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. यल्लावा करीहोळ (वय 30) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर सात्विक (वय 5) आणि मुतप्पा (वय 1 वर्षे) असं विहिरीत उडी घेतल्याने मृत्युमुखी पडलेल्या दोन चिमुकल्यांची नाव आहेत. 

मुलीने चिमुकल्यांसह आयुष्य संपवल्याने माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला

याबाबत अधिकची माहिती अशी की, यल्लावा करीहोळ या महिलेचा तिच्या पतीसोबत वारंवार वाद होत होता, दोघांमध्ये सातत्याने भांडण देखील व्हायचे. त्यामुळे यल्लावा करीहोळ ही महिला नैराश्यात गेली होती. तिने आज (दि. 29) टोकाचा निर्णय घेत दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, आपल्या मुलीने चिमुकल्यांसह 
आयुष्य संपवल्याने माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडलाय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तिघांचे मृतदेह बाहेर काढलेत. उत्तरीय तपासणी करुन मृतदेह संबंधितांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. 

इंदापूरमध्येही 7 वर्षांची चिमुकली पोरकी झाली

इंदापूर तालुक्यातही अशीच आत्महत्येची घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी बायकोचा मृत्यू झाल्यानंतर नैराश्यात गेलेल्या नवऱ्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. दरम्यान, पतीनेही आयुष्य संपवल्याने 7 वर्षांची चिमुकली पोरकी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बायकोच्या मृत्युमुळेच डिप्रेशनमध्ये गेलेल्या नवऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. 

पत्नी श्रावणी हिला डेंग्यूची लागण झाली होती

याबाबत अधिकची माहिती अशी की, स्वप्नील सुतार यांच्या पत्नी श्रावणी हिला डेंग्यूची लागण झाली होती. डेंग्यूशी झुंज देत असतानाच तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर स्वप्नील नैराश्यात गेल्याचं चित्र होतं. मी थकलोय जरा आराम करतो, असं म्हणत स्वप्नील त्याच्या रुममध्ये गेला आणि त्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. त्यास तातडीने ग्रामीण रुग्णालयात आले. मात्र उपचार सुरु करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

इंदापुरात पत्नीच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेलेल्या पतीने आयुष्य संपवलं, नियतीच्या क्रूर खेळात 7 महिन्यांची चिमुकली पोरकी

Sushilkumar Shinde : विलासराव देशमुखांनी आणलेल्या कागदावर सही केली अन् फसलो, शरद पवारांना मान्य होतं नव्हतं; सुशीलकुमार शिंदेंनी सांगितला किस्सा

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.