अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडीस या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 49.2 ओव्हरमध्ये 324 धावा केल्या. मात्र त्यानंतरही न्यूझीलंडला विजयासाठी फक्त 221 धावांचं आव्हान मिळालं आहे. या सामन्यांचं आयोजन हे दांबुला येथे करण्यात आलं आहे. श्रीलंकेच्या डावातील शेवटचे 4 बॉल बाकी असताना पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे खेळ थांबवावा लागला. पावसामुळे 2 पेक्षा अधिक तासांचा वेळ वाया गेला. त्यामुळे न्यूझीलंडला डीएलएसनुसार 27 ओव्हरमध्ये 221 धावांचं सुधारित आव्हान मिळालं आहे.
श्रीलंकेसाठी कुसल मेंडीस याने सर्वाधिक 143 धावा केल्या. तर अविष्का फर्नांडो शतकानंतर (100) बाद झाला. कुसलने 128 बॉलमध्ये 17 चौकार आणि 2 षटकारांसह 143 धावा केल्या. तर अविष्काने 115 बॉलमध्ये 9 फोर आणि 2 सिक्ससह 100 धावा पूर्ण केल्या. या दोघांच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे चौथं शतक ठरलं. या दोघांव्यतिरिक्त पाथुम निसांका याने 12, सदीरा समरविक्रमाने 5 आणि कॅप्टन चरिथ असलंका याने 40 धावांचं योगदान दिलं.
दरम्यान कुसल मेंडीस आणि अविष्का फर्नांडो या जोडीने ऐतिहासिक आणि विक्रमी भागीदारी केली. या दोघांनी श्रीलंकेकडून कोणत्याही विकेटसाठी 206 धावांची सर्वोच्च भागीदारी केली. या दोघांनी यासह सनथ जयसूर्या आणि उपूल थरंगा या दोघांचा 18 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड उद्धवस्त केला. जयसूर्या आणि थरंगा या दोघांनी 2006 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध नॅपियर येथे 201 धावांची भागीदारी केली होती.
न्यूझीलंडसमोर 221 धावांचं आव्हान, जिंकणार का?
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, महेश थेक्षाना, जेफ्री वांडरसे, दिलशान मदुशंका आणि असिथा फर्नांडो.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), टिम रॉबिन्सन, विल यंग, हेन्री निकोल्स, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मिच हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, इश सोधी आणि जेकब डफी.