ब्लडप्रेशर असलेल्यांनी कधी, किती वाजता करावा नाश्ता? योग्य पद्धत काय?
GH News November 14, 2024 04:15 PM

सध्या सगळ्यांचेच आयुष्य धावपळीचे झाले आहे. हे धावपळीचे आयुष्य जगताना आणि कामाच्या तणावामुळे अनेकदा माणूस तहान भूक देखील विसरतो. उच्च रक्तदाबांच्या रुग्णांनी योग्य वेळी नाश्ता केला पाहिजे, जेणेकरून त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहील आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

तरुणांमध्ये ही उच्च रक्तदाबाची समस्या आता वृद्धांच्या बरोबरीनेच वाढली आहे. उच्च रक्तदाबाच्या समस्येला आता सामान्य समस्या म्हणून पाहिले जाते. याला जीवनशैलीचा आजार असेही म्हटले जाऊ शकते. कारण आपली जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी, कमी शारीरिक हालचाली आणि लठ्ठपणा हे याचे मुख्य घटक आहे. पण आपल्या जीवनशैलीत बदल करून यावर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवल्या जाऊ शकते, असे डॉक्टरांची म्हणणे आहे. कारण ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.

नाश्ता करण्याची योग्य वेळ : निरोगी रक्तदाबासाठी उठल्यानंतर एक तासाच्या आत नाश्ता करणे आवश्यक आहे. असे केल्यामुळे तुमच्या शरीराला रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. ज्यामुळे तुमच्या हृदयावर कमी ताण येतो आणि यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. झोपेतून उठल्यानंतर अर्धा तास ते एक तासामध्ये नाश्ता केल्यास शरीराला ऊर्जा मिळते.

नाश्ता कसा करायचा?

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही पौष्टिक गोष्टींचा समावेश करून नाश्ता करू शकता. निरोगी नाश्ता केल्यामुळे तुमचा हृदयाला त्याचे काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक असलेली पोषक तत्त्वे मिळतील. ज्यामुळे तुमचा रक्तदाब देखील नियंत्रणात राहील. म्हणून रोजच्या नाश्त्यामध्ये पौष्टिक गोष्टींचा समावेश असायला हवा. जेणेकरून तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहील.

नाश्ता न करण्याचे दुष्परिणाम

जर तुम्ही सकाळी नाश्ता केला नाही तर तुमच्या शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. रिकाम्या पोटी राहिल्याने ॲसिड तयार होते. त्यामुळे गॅसची समस्या निर्माण होते, बीपी वाढू लागतो आणि ग्लुकोजची पातळीही वाढते. याशिवाय नाश्ता न केल्यास हृदयविकाराचा धोका 21 टक्क्याने वाढू शकतो. यामुळेच तुम्ही जर सकाळी नाश्ता करत नसाल तर ही सवय आत्ताच बदला. झोपेतून उठल्याच्या तासभरात जर तुम्ही नाश्ता करू शकत नसाल तर शक्य तितक्या लवकर नाश्ता करण्याचा प्रयत्न करा. तसेच घाईत नाश्ता करण्याऐवजी चांगला वेळ काढा कारण रक्तदाबाचा ही तुमच्या खाण्याच्या सवयीशी संबंध असतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.