सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडवर मानवी तस्करांचा हल्ला; नेमकं घडलं काय?
नामदेव जगताप November 14, 2024 05:13 PM

Salman Khan EX Girlfriend Attacked By Human Traffickers: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री (Bollywood Actress) आणि सलमान खानची (Salman Khan Ex) एक्स गर्लफ्रेंड सोमी अली (Somy Ali) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ते तिच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे. यापूर्वी सोमी अली चर्चेत आलेली ते, तिनं लॉरेन्स बिष्णोईला (Lawrence Bishnoi) भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती तेव्हा. आता प्रकरण वेगळं आहे. आता सोमी अलीवर हल्ला झाला असून तिला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. नेमकं काय घडलं? सोमी अलीसोबत जाणून घेऊयात सविस्तर... 

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सोमी अली तिच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अशातच सोमी अलीनं खुलासा केला आहे की, मानवी तस्करीला बळी पडलेल्या महिलेला वाचवताना तिच्या हाताला फ्रॅक्चर झालं असून अनेक जखमा झाल्या असल्याचंही तिनं सांगितलं आहे. 

अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती सोमी अलीनं स्वतः तिच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती देताना सांगितलं की, मानवी तस्करीला बळी पडलेल्या महिलेला वाचवताना तिच्यावर हल्ला झाला आणि तिला गंभीर दुखापत झाली आहे. तिनं सांगितलं की, मानवी तस्करांनी तिचा हार पिरगळला, ज्यामुळे तिच्या हाताला हेयरलाईन फ्रॅक्चर झालं आहे. तिनं सांगितलं की, "मला खूप वेदना होत आहेत, मी झोपून आहे..."

सोमी अलीनं ती सामाजिक कार्यकर्ती असल्याचा दावा केला आहे. 48 वर्षांच्या सोमी अलीनं म्हटलं की, "मी मानवी तस्करीच्या शिकार झालेल्यांना वाचवण्यासाठी पोलिसांसोबत एकत्र येऊन काम करत आहे. जोपर्यंत पोलीस त्या पीडित व्यक्तीला वाचवत नाहीत आणि तस्करांना पकडत नाही, तोपर्यंत मी माझ्या गाडीतून बाहेर पडू शकत नाही. कारण तस्करांकडे हत्यारं असू शकतात."

मोहीम राबवतेय सोमी अली

सोमी अली पुढे म्हणाली की, ती गेल्या 17 वर्षांपासून 'नो मोअर टीयर्स' मोहीम राबवत आहे आणि या काळात तिच्यावर झालेला हा नववा हल्ला आहे. पीडित आणि तस्करांची एकत्र वाट पाहत होते. पीडितेला ती कामाला जात असलेल्या घरात मानवी तस्कर असल्याची कल्पना नव्हती. अशा परिस्थितीत सोमी अली तिच्या गाडीतून खाली उतरली. मानवी तस्करही तिथे आले. त्यांनी सोमी अलीचा हात पिरगळला, त्यानंतर तिच्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर झालं.

सोमी अलीला गंभीर दुखापत झालेली नसली तरी तिला हेअरलाईन फ्रॅक्चर झालं आहे. तसेच, तिला खूप वेदना होत असल्याचंही तिनं सांगितलं आहे. तिला बरं होण्यासाठी अजून 6 ते 8 आठवडे जातील, असंही तिनं सांगितलं. तिचं डावं मनगट आणि हाताला खूपच सूज आली आहे. तसेच, हाताला प्लास्टर केल्यामुळे तिला विश्रांती घ्यावी लागणार आहे. तसेच, 2013 मध्ये एका तस्करानं तिच्यावर बंदूक रोखल्याचंही तिनं सांगितलं. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.