Bollywood Actress Yami Gautam Baby Name : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि तिचा पती दिग्दर्शिक आदित्य धार यांना काही महिन्यांपूर्वी पुत्ररत्न झालं. आता यामी गौतमने तिच्या बाळाच्या युनिक नावाची घोषणा केली आहे. अभिनेत्री यामी गौतमने बाळाचं नाव 'वेदविद' असं ठेवलं आहे. यामीने या नावाचा अर्थ सांगितलं आहे. यामीने म्हटलं आहे की, मला अजूनही विश्वास बसत नाही की, मी आई झाली आहे. मुलाच्या जन्मानंतर सहा महिन्यांनी यामीने पहिल्यांदा मुलासोबत बालदिन साजरा केला. यानिमित्ताने तिने प्रतिक्रिया दिली आहे. यामी अलिकडेच एका मुलाखतीत तिच बाळ आणि आई झाल्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्री यामी गौतमने 10 मे 2024 रोजी गोंडस बाळाला जन्म दिला. तिच्या मुलाचं नाव 'वेदविद' असून आता तो सहा महिन्यांचा झाला आहे. अलिकडेच हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत यामीने तिच्या सध्याच्या लाईफबद्दलच्या अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. यामीने यावेळी तिच्या पतीबद्दलही सांगितलं आहे. यामीने मुलाखतीत सांगितलं की, ती आई झाली आहे, ही तिच्यासाठी अजूनही अविश्वसनीय बाब आहे. यामी गौतम म्हणाली की, "मला अजूनही कधी-कधी विश्वास बसत नाही की, मी एक आई आहे. मी कुणासोबत बोलत असते, तेव्हा वेदविदबद्दल बोलताना 'माझा मुलगा' असं सांगावं लागतं आणि ही अशी वेळ आहे, जेव्हा तुम्ही ही बाब पूर्ण जोर देऊन समोरच्याला सांगता".
बाळ झाल्यावर महिलेची प्राथमिकता बदलते का, यावर बोलताना यामी म्हणाली की, या बदलाचा मी अनुभव घेतला आहे. यामी गौतमने सांगितलं, "नक्कीच! मला तो दिवस आठवतो, जेव्हा मी रुग्णालयातून घरी परतले होते आणि प्रत्येकाला बाळाला पाहण्याची इच्छा होती. प्रत्येक कुटुंबामध्ये असंच होतं, तुम्हाला माहित असेल. मी एक क्षण थांबले आणि आदित्यचा बाजूला बसले. मी म्हणाले, 'मला नाही माहित याला कसं समजावू, पण या क्षणाच्या आधी माझं आयुष्य धुरकट होतं'. तुम्ही एका बाळाला जन्म नाही देत, तुम्ही स्वत:ला जन्म देता. ही अतिशयोक्ती नाही. त्या एका क्षणात सर्व काही बदलते, मानसिक, भावनिक, शारीरिक".
यामी गौतमने तिच्या मुलाच्या वेदविद या युनिक नावाचा अर्थ आणि नाव कसं ठरवलं याबद्दल सांगितलं. वेदविद हे भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचं नाव आहे आणि "जो सर्व वेद जाणतो" असा या नावाचा अर्थ आहे. यामी पुढे हसत म्हणाली की, यामुळे त्याच्यावर खूप दबाव आहे! आदित्य आणि मी दररोज मुलासाठी नवीन टोपणनाव शोधतो, पण आमचं एका नावावर अडलं आहे ते नाव म्हणजे जेडी-ज्युनियर धर! माझ्या गरोदरपणात एक दिवस आम्ही चित्रपट पाहत असताना माझा भाऊ ओजसने हे टोपणनाव सुचवलं. मला हे नाव खूप आवडलं. आम्ही त्याला विचारलं की, 'मुलगी झाली तर नाव काय ठेवायचं?' त्यावर तो म्हणाला की, 'ती ही जेडी म्हणजे ज्युनियर धरच असेल'.