वर्षातून दोनदा कॉलेजमध्ये प्रवेश, विद्यार्थ्यांसाठी या सुविधा, UGCच्या नव्या गाईडलाईन्स काय ?
GH News December 06, 2024 07:12 PM

UGC ने नवीन नियमावली जारी केली आहे. हे नवीन नियम उच्च शिक्षणात अधिक लवचिकता आणतील. त्यासोबतच शिस्तबद्ध, कडकपणा दूर करतील. सर्व समावेशकता आणतील आणि विद्यार्थ्यांना अनेक विषय शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देतील. विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांना तीन वर्षांची डिग्री अडीच वर्षात मिळवता येणार आहे. चार वर्षांची ऑनर्स डिग्री तीन वर्षात मिळणार आहे. विद्यापीठांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी दोनदा ॲडमिशन घेऊ शकणार आहे. जुलै – ऑगस्ट महिन्यात आणि जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. याबाबत तशी तरतूद करण्यात आली आहे.

UGC चे अध्यक्ष एम. जगदीश कुमार म्हणाले की आम्ही शालेय शिक्षणाच्या कठोर शिस्त-विशिष्ट आवश्यकतांमधून UG आणि PG प्रवेशासाठी पात्रता देखील वेगळी केली आहे. या नियमांनुसार, विद्यार्थी त्यांच्या मागील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कोणताही अभ्यासक्रम निवडू शकतात. यासाठी विद्यार्थ्याला संबंधित अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असेल.

यूजीसीचे चेअरमन म्हणाले की, विद्यार्थ्यांना आता त्यांच्या प्रमुख विषयातील 50% क्रेडिट मिळवायचा पर्याय असेल. विद्यार्थ्यांना पदवी मिळवण्यासाठी 50 टक्के हे अभ्यासक्रमाला द्यावे लागणार आहेत. तर उर्वरित 50% क्रेडिट्स हे  कौशल्य विकास, शिकाऊ किंवा बहुविषयक विषयांसाठी त्यांचे वाटप करता येणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.  या नवीन नियमान द्वारे आम्ही भारतीय उच्च शिक्षण जागतिक मानांकनुसार विकसित होईल याची खात्री आहे. तसेच सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत, असे त्यांनी नमूद केले.

यूजीसीने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार पदवी पूर्ण, पदवीचा कालावधी तीन किंवा चार वर्षांचा असेल आणि पदवी, पदव्युत्तर पदवी साधारणपणे एक किंवा दोन वर्षांची असेल. कालावधी कमी किंवा जास्त असू शकतो. तर यूजीचे विद्यार्थ्यांनी नियोजित वेळेपूर्वी किंवा नियोजित वेळेनंतर त्यांची पदवी ते पूर्ण करू शकतात. या संदर्भातील अधिक माहिती युजीसीच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.