UPSC Success Story: नोकरी करत सुरु केला अभ्यास, कोचिंगशिवाय बनली IAS अधिकारी
GH News December 10, 2024 02:06 AM

UPSC परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी रणनीती खूप महत्त्वाची असते. आम्ही तुम्हाला एका अशा IAS अधिकाऱ्याची यशोगाथा सांगणार आहोत, जिने कोणत्याही कोचिंगशिवाय ही परीक्षा स्व-अभ्यासातून उत्तीर्ण करुन दाखवली. प्रशिक्षण घेणे किंवा न घेणे हे उमेदवारावर अवलंबून असते. पण UPSC परीक्षा पास होणे खूप कठीण असते. या परीक्षेच्या तयारीसाठी बहुतांश उमेदवार कोचिंग घेतात. यासाठी ते लाखो रुपये खर्च करतात. पण या परीक्षेबाबत सर्जना यादव यांचे मत वेगळे आहे. एका मुलाखतीत सर्जना यादव म्हणतात की, उमेदवाराला कोचिंग घ्यायचे आहे की नाही हे त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे.

जर तुम्हाला वाटतंय की तुमच्याकडे अभ्यासासाठी पुरेसे साहित्य आहे. तुम्ही UPSC साठी चांगली रणनीती बनवली आहे, तर तुम्ही स्व-अभ्यासावर यश मिळवू शकता.

जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की तो कोचिंग घेत अधिक चांगली कामगिरी करू शकेल, तर त्याने कोचिंगमध्ये जावे. जर तुम्ही अभ्यासाप्रती प्रामाणिक असाल आणि तुमच्या स्वत:वर विश्वास असेल तर तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता.

सरजना यादवने दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून इंजिनीअरिंग केले आहे. पदवीनंतर त्यांनी ट्रायमध्ये संशोधन अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर नोकरीसोबतच, सर्जना यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आले पण नंतर तिसऱ्या प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या.

चुकांमधून बरेच काही शिकले असे त्यांनी म्हटलंय. परीक्षेची चांगली तयारी करण्यासाठी सर्जना यांनी 2018 मध्ये नोकरी सोडली. 2019 मध्ये त्यांनी नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतीय 126 वा क्रमांक मिळविला.

यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सर्जना सांगतात की, जास्त पुस्तके वाचण्याऐवजी उमेदवाराने मर्यादित पुस्तके वाचावीत. उमेदवाराने तीच पुस्तके पुन्हा पुन्हा वाचत राहावीत. माहिती, व्हिडिओ आणि ट्यूटोरियल्स गुगलवर उपलब्ध आहेत. जेणेकरून तुमच्या मनात एकही शंका राहणार नाही.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.