Cricket Viral Video: एखादा दिवस नशीब एवढं खराब असतं की त्यापुढे कोणाचंच चालत नाही. मग ते खासगी आयुष्य असो की खेळाचे मैदान, एखादं संकट असं अचानक येतच. आजचा किस्साही असाच आहे क्रिकेटच्या मैदानातला. क्रिकेट सामन्यांमध्ये आपल्याला अनेक विनोदी किस्से पाहायला मिळतात. पण हा किस्सा पाहून काहीजण हसतील, तर काहींना वाईट देखील वाटेल. काहीजण व्हिडीओमधील फलंदाजाला दोष देतील, तर काहीजण त्याच्या नशीबाला.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये क्रिकेटच्या मैदानावरील एक अनोखा रन आऊट पाहायला मिळत आहे. फलंदाजाचे नशीब खराब होतेच पण थोडा त्याचा शाहापणा नडला आणि तो बाद होऊन हसत हसत तंबूत परतला. व्हिडीओतील कमेंटमध्ये प्रत्येकाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पण हा व्हिडीओ पाहा आणि ठरवा कोणाची चूक आहे.
झालं असं की, फलंदाजाने शॉर्टच्या देशेने चेंडूला दिशा दिली. एक धाव काढण्यात त्यांना यश आले. पण फिल्डरने केलेला थ्रो यष्टीक्षकाला पकडता आला नाही आणि नॉन स्ट्राईकला आलेल्या फलंदाजाने दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू यष्टीरक्षाच्या हाताला लागून थेट स्ंटपला येऊन धडकला आणि क्रिज सोडलेल्या फलंदाजाला बाद होऊन माघारी परतावे लागले.
गोलंदाजी संघाला फुकटचा विकेट मिळाला आणि बाद झालेला फलंदाज हसत हसत मैदानाबाहेर पडला. एका गोलंदाजी संघातील क्षेत्ररक्षकाला वाईट वाटले, त्याने या विकेटवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. क्रिकेटच्या मैदानावर असे अनेक विनोदी व भावनिक किस्से घडत असतात. अशावेळी कधी कधी हसायला येत, तर कधी कधी वाईट वाटतं. पण असे कितीही किस्से घडले तरी आपण क्रिकेट खेळणे आणि क्रिकेट पाहाणे कधीच सोडत नाही.