6,6,6,6,6,6,6,6,6..! भारतीय खेळाडूची आक्रमक खेळी, सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडला
GH News December 21, 2024 09:11 PM

विजय हजारे स्पर्धेची सुरुवात एकदम दमदार झाली आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीची छाप पाडली. अरुणाचल प्रदेश आणि बिहार यांच्यात जबरदस्त सामना झाला. या सामन्यात एक रेकॉर्डब्रेक कामगिरी पाहता आली. या खेळीसह लिस्ट ए सामन्यात सर्वात वेगवान शतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम युसूफ पठाणच्या नावावर होता. आता पंजाबच्या अनमोलप्रीत सिंहने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अरुणाचलविरुद्ध लिस्ट ए सामन्यात सर्वात वेगवान शतक ठोकलं. अनमोलप्रीत सिंहने फक्त 35 चेंडूत शतक पूर्ण केलं आणि इतिहास रचला. अनमोलप्रीत सिंहने या सामन्यात 45 चेंडूत नाबाद 115 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 9 षटकार मारले. या डावात त्याचा स्ट्राईक रेट हा 255.56 चा होता. तसेच या खेळीच्या जोरावर त्याने संघाला विजय मिळवून दिला. 2009-2010 मध्ये विजय हजारे ट्रॉफीत बरोडाकडून खेळताना युसूफ पठाणने 40 चेंडूत शतक ठोकलं होतं.

दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय पातळीवर लिस्ट ए स्पर्धेत सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा जेक फ्रेजर-मॅकगर्क पहिल्या स्थानावर आहे. त्याने 29 चेंडूत शतकी खेळी केली होती. तर दक्षिण अफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्ससने 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 31 चेंडूत शतक ठोकलं होतं.

पंजाब विरुद्ध अरुणाचल प्रदेश

पंजाबने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अरुणाचल प्रदेशने 48.4 षटकात सर्व गडी बाद 164 धावा केल्या. पंजाबने हे लक्ष्य अवघ्या 12.3 षटकात पूर्ण केलं. अनमोलप्रीत सिंह या विजयाचा हिरो ठरला. पंजाबचा पुढचा सामना 23 डिसेंबरला नागालँडशी होणार आहे.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

अरुणाचल प्रदेश : नबाम अबो (कर्णधार) , टेची डोरिया , कमशा यांगफो (विकेटकीपर) , याब निया निया , नीलम ओबी , टेची नेरी , हार्दिक वर्मा , प्रिन्स यादव , देवांश गुप्ता , हनी खारी , रवि प्रकाश.

पंजाब : अभिषेक शर्मा (कर्णधार) , अनमोल मल्होत्रा ​​(विकेटकीपर) , रमणदीप सिंग , सनवीर सिंग , अनमोलप्रीत सिंग , नेहल वढेरा , प्रभसिमरन सिंग , अश्वनी कुमार , मयंक मार्कंडे , रघु शर्मा , बलतेज सिंग

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.