Nana Patole: नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई यांचे वृद्धापकाळाने निधन
esakal December 29, 2024 03:45 PM

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज (रविवार) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पटोले कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मीराबाई पटोले यांच्या पार्थिवावर आज दुपारी २ वाजता भंडारा जिल्ह्यातील सुकळी, ता. साकोली येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनामुळे पटोले कुटुंबियांना आधार देण्यासाठी स्थानिक नागरिक आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सुकळी येथे उपस्थित होणार आहेत.

नाना पटोले यांच्यासाठी मोठा धक्का

मीराबाई पटोले यांचे निधन हे यांच्यासाठी मोठा भावनिक धक्का आहे. आईने दिलेल्या संस्कारांमुळेच नाना पटोले यांनी आपल्या राजकीय प्रवासात मोठी उंची गाठली, असे सांगितले जाते. मीराबाई पटोले यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.

राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली

महाराष्ट्रातील विविध राजकीय नेत्यांनी मीराबाई पटोले यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पटोले कुटुंबियांना आधार देण्यासाठी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.