भारत ऑस्ट्रेलिया सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताचा पहिला डाव 369 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडे 105 धावांची मजबूत आघाडी होती. या धावांच्या पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाची आघाडी फलंदाजी ढासळली. 91 धावांवर ऑस्ट्रेलियाचे 6 गडी तंबूत होते. त्यामुळे टीम इंडियाला विजयाच्या आशा दिसत होत्या. पण यशस्वी जयस्वालच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका टीम इंडियाला बसला. मार्नस लाबुशेन आणि पॅट कमिन्सचा झेल सोडणं टीम इंडियाला महागात पडलं. त्यामुळे सातव्या विकेटसाठी टीम इंडियाला खूपच झुंज द्यावी लागली. 91 धावांपासून सातव्या विकेटसाठी 148 धावांपर्यंत वाट पाहावी लागली. या जोडीने 57 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शेपटच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना झुंजवलं. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विकेट काही जाऊ दिल्या नाहीत. इतकंच काय तर यशस्वी जयस्वालने उस्मान ख्वाज याचा झेलही सुरुवातीला सोडला होता. तेव्हा तो 2 धावांवर खेळत होता. मात्र त्यानंतर टीम इंडियाला 19 धावांचा भुर्दंड भरावा लागला. उस्मान ख्वाजा 21 धावा करून बाद झाला.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 228 धावांवर 9 गडी गमावले होते. तसेच आघाडी मिळून 333 धावा झाल्या आहेत. त्यामुळे भारताचा विजय आता काही शक्य नाही असंच क्रीडाप्रेमींना वाटत आहे. त्यामुळे भारतीय संघ पाचव्या दिवशी कशी कामगिरी करतो याकडे लक्ष आहे. चौथ्या दिवशी नाथन लियॉन नाबाद 41 आणि स्कॉट बोलँड नाबद 10 धावांवर खेळत आहेत. या दोघांनी मिळून 19 षटकांचा सामना केला हे विशेष..
दोन्ही संघांना हा सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना ड्रॉ झाला तर गुणतालिकेत फार काही फरक पडणार नाही. पण भारताचा चौथा सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. जर तसं झालं नाही तर भारताचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगणार आहे. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिका पहिला कसोटी सामना विजयाच्या वेशीवर उभी आहे. त्यामुळे हा सामना जिंकताच अंतिम फेरी गाठणारा पहिला संघ ठरेल.