इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकर यांच्या चौकशीसाठी कोल्हापुरातून पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. या पथकामध्ये एक अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक थोड्याच वेळात नागपूरला पोहचणार आहे. इंद्रजीत सावंत यांनी मंगळवारी सायंकाळी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. कोल्हापूर पोलिस नागपूरमध्ये जाऊन कोरटकर यांना ताब्यात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Maharashtra Cabinet Meeting : राज्य आधारसामग्री डेटा धोरणास मान्यताMumbai News: फडणवीस सरकारने आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. त्यात महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरणास मान्यता देण्यात आली. राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती स्थापन करण्यात येणार आहे.
Santosh Deshmukh Case live : सुरेश धस यांची मागणी मान्यमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली होती. त्यांची ही मागणी सरकारने मान्य केली आहे.
Ambadas Danve : हत्या प्रकरणातील फरार आरोपीचं बरंवाईट झालं का तपासामहाशिवरात्रीनिमित्त राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिर येथे जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी राज्याच्या प्रजेला सुखी आणि समृद्ध कर अशी प्रार्थना केली. तसंच माध्यमांशी बोलताना त्यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपीचं बरंवाईट झालं का तपासावे? असा संशय व्यक्त केला.
Ambadas Danve : महाशिवरात्रीनिमित्त अंबादास दानवेंनी घेतलं घृष्णेश्वर महादेवाचं दर्शनआज देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिर येथे जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी राज्याच्या प्रजेला सुखी आणि समृद्ध कर अशी प्रार्थना केली.
Eknath Shinde : नीलम गोऱ्हेंनी काळे धंदे बाहेर काढल्याने ठाकरेंना मिरच्या लागल्या - एकनाथ शिंदेशिवसेना (शिंदे गट) प्रमुख नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हेंनी केलेल्या मर्सिडीज बाबातच्या वक्तव्याची पाठराखण केली आहे. नीलम गोऱ्हे जे बोलल्या ते काही जणांना प्रचंड झोंबलं आहे. गोऱ्हेंनी काळे धंदे बाहेर काढल्याने त्यांना मिरच्या लागल्या, 'नीलम गोऱ्हे त्यांच्याबाबत आताच बोलल्यात असे नाही, यापूर्वी अनेक लोक बोलले आहेत. राज ठाकरे बोलले, त्यांना खोके नाही तर कंटेनर लागतात. नारायण राणे, रामदास कदम, नितेश राणे, निलेश राणे देखील यापूर्वी बोलले आहेत. मात्र नीलम गोऱ्हे बोलल्या. त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे तुम्हाला शोभत नाही. त्या खरे बोलल्या. आमची देना बँक आहे आणि समोर लेना बँक आहे, असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर घणाघात करत गोऱ्हेंची पाठराखण केली.
मुंबई मेट्रोसाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या सिस्त्रा या कंपनीचं कंत्राट रद्द करणाऱ्या MMRDA ला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं MMRDA ने सिस्त्रा कंपनीला बजावलेली नोटीस बेकायदेशीर ठरवत ती रद्द केली आहे. दिलेलं कंत्राट रद्द करत एमएमआरडीएनं पाठवलेल्या नोटीशीविरोधात कंपनीनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर एमएमआरडीएने सदर कंपनीचं म्हणणं पुन्हा ऐकून घ्यावं आणि त्याबाबत योग्य निर्णय घ्यावा, असे आदेशही न्यायालयाने MMRDA ला दिले आहेत.