दोन भावांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचं रूपांतर भांडणात झालं. भांडण झाल्यानंतर एका भावानं सख्ख्या भावाची हत्या केली. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावात घडली आहे. घरासमोरच ही हाणामारी झाल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. शुल्लक कारणावरून ही हत्या झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. शुल्लक कारणावरून एका भावाने सख्ख्या भावाची हत्या केली आहे. दोन भावांमध्ये शेवग्याच्या शेंगांवरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये जोरदार वाद झाला, वादाचं रूपांतर हाणामारीत झालं.
दोघा सख्ख्या भावांमध्ये वाद घरासमोरच झाला. अशी माहिती काही घराशेजारील नागरीकांनी दिली. सुभाष चासकर यांनी केलेल्या बेदम हाणामारीत चंद्रकांत चासकर यांचा जागीच मृत्यू झाला. सुभाष चासकर हे अग्निशमन दलातील रिटायर्ड कर्मचारी असल्याची माहिती आहे. चंद्रकांत चासकर यांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
चंद्रकांत चासकर यांचा मृतदेह मंचर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. या घटनेबाबत पोलीस अधिक तपाल करीत असून, शुल्लक कारणावरून झाल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.