इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होणार आहे. हा आयपीएलचा १८ वा हंगाम आहे.
या हंगामाला आता एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे संघांची त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे.
चेन्नई सुपर किंग्सही लवकरच हंगामापूर्वी खेळाडूंचे शिबिर घेत आहेत. यासाठी त्यांचे खेळाडू चेन्नईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा थाला म्हणून ओळखला जाणारा माजी कर्णधार एमएस धोनीही २६ फेब्रुवारी रोजी आयपीएलच्या १८ व्या हंगामाच्या तयारीसाठी चेन्नईला दाखल झाला आहे.
धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन ५ वर्षांपेक्षाही अधिक कालावधी झाल्याने त्याला चेन्नईने अनकॅप खेळाडू म्हणून संघात ४ कोटी रुपयांना रिटेन केले आहे.
धोनीने गेल्यावर्षी या संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे सोपवले आहे. त्यामुळे यंदाही तो त्याच्याच नेतृत्वात खेळताना दिसणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून धोनीच्या आयपीएलमधील निवृत्तीची चर्चा होत आहे, त्यामुळे आता या हंगामानंतर तो काय निर्णय घेणार याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ या पाच हंगामात आयपीएल विजेतेपद जिंकले आहे.
धोनीने आयपीएलमध्ये २६४ सामन्यात २४ अर्धशतकांसह ५२४३ धावा केल्या आहेत. त्याने यष्टीरक्षक म्हणून १९० विकेटही घेतल्या आहेत.