मुख्यमंत्री नितीश कुमार मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. यावेळी भाजप कोट्यातील फक्त सात आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
संजय सरावगी हे मोठे वैश्य नेते असून दरभंगा मतदारसंघाचे आमदार आहेत. सलग पाचवेळा ते विधानसभा निवडणूक जिंकले आहेत.
डॉ. सुनील कुमार हे नालंदा येथील बिहार शरीफ मतदारसंघाचे आमदार आहेत. ते सलग तीनवेळा आमदार राहिले आहेत आणि ते मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या गृह जिल्ह्यातून येतात.
जीवेश कुमार मिश्रा हे दुसऱ्यांदा मंत्री झाले आहेत. ते सलग दोन टर्म आमदार आहेत. ते दरभंगाच्या जाले मतदारसंघाचे भाजप आमदार आहेत.
राजू सिंह हे मिथिला प्रदेशातील मोठे राजपूत नेते आहेत. मुजफ्फरपूरच्या साहिबगंज मतदारसंघाचे ते आमदार आहेत.
मोतीलाल प्रसाद सीतामढीच्या रीगा मतदारसंघातील भाजप आमदार. ते दोनदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
कृष्ण कुमार मंटू हे सारणच्या अमनौर मतदारसंघातून भाजप आमदार आहेत. २०१० मध्ये ते जेडीयूच्या तिकिटावर आमदार झाले. २०२० मध्ये भाजपच्या तिकिटावर जिंकले.
विजय कुमार मंडल सीमांचल प्रदेशात त्यांचा मजबूत प्रभाव आहे. ते अररियाच्या सिकटी मतदारसंघाचे आमदार आहेत. पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सर्व मंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.