Israel vs Hamas : ४ मृतदेहांच्या बदल्यात ६०० कैद्यांची सुटका, हमसासमोर इस्रायल हतबल
esakal February 27, 2025 06:45 AM

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या दीड वर्षापासून युद्ध सुरू होतं. आता दोघांमध्ये शस्त्रसंधीचा करार झालाय. या युद्धात आतापर्यंत जवळपास ४६ हजार लोकांचा मृत्यू झालाय. शस्त्रसंधीनंतर इस्रायलला त्यांच्या कैद्यांच्या बदल्यात मोठी किंमत मोजावी लागलीय. ४ कैद्यांच्या मृतदेहाच्या बदल्यात हमासचे शेकडो कैदी सोडावे लागणार आहेत. हे कैदी असे आहेत ज्यांना दहशतवादी घटनांच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं होतं. शस्त्रसंधीचा पहिला राऊंड संपण्याआधी इस्रायलला कैदी सोडावे लागणार आहेत.

इस्रायलने शनिवारपासून कैद्यांची सुटका करणं पुढे ढकललं. हमाससोबत जे डील करत आहोत ते खूप क्रूर आहे. तर हमासने म्हटलं की, इस्रायलकडून उशीर करणं हे शस्त्रसंधीचं गंभीर उल्लंघन आहे. या प्रस्तावाची अंमलबजावणी झाली नाही तर दुसऱ्या राउंडची शस्त्रसंधी कठीण होईल.

हमासच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, इस्रायलकडून ज्या दिवशी ६०० कैदी सोडले जातील त्याच्या दुसऱ्या दिवशी ४ कैद्यांचे मृतदेह सोपवले जातील. सुरुवातीच्या टप्प्यात १ इस्रायलीच्या बदल्यात हमासने ३० कैद्यांच्या सुटकेची मागणी केली होती. आता ही मागणी पुन्हा वाढवली जात आहे. आता ४ कैद्यांच्या मृतदेहाच्या बदल्यात शेकडो कैद्यांच्या सुटकेची मागणी केली जात आहे.

इस्रायल आणि हमासने म्हटलं होतं की, ४ मृतदेह सोपवण्यासाठी करार झालाय. पण आतापर्यंत यावर काहीच अंमलबजावणी झाली नाहीय. इस्रायलने जेव्हा जेव्हा कैद्यांची सुटका केलीय तेव्हा तेव्हा हमासने गर्दी जमवली होती. इस्रायलच्या कैद्यांना लोकांकडून अभिवादन करण्यासाठी मजबूर केलं जातं. हे डील इस्रायलसाठी अपमानास्पद असंच आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.