दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शालीमार बागेत महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.
Crime News: साउथ एशियन युनिव्हर्सिटीमध्ये एका विद्यार्थिनीला मारहाणसाउथ एशियन युनिव्हर्सिटीमध्ये एका विद्यार्थिनीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ आजचा आहे आणि कॅन्टीनमध्ये जेवणाच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये वाद झाला आणि नंतर हाणामारी झाली. पीडित विद्यार्थिनीने पीसीआर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. सध्या, पीडितेची वैद्यकीय तपासणी केली जात आहे आणि तथ्ये पडताळली जात आहेत: दिल्ली पोलिस
Pune Case: राष्ट्रीय महिला आयोगाने पुण्यातील बस बलात्कार प्रकरणाची स्वतःहून दखल घेतलीराष्ट्रीय महिला आयोगाने पुण्यातील बस बलात्कार प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली, तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
Mumbai News: गुजरातच्या वृद्ध व्यापाऱ्याचे मुंबईत अपहरणगुजरात राज्यातील वृद्ध व्यावसायिकाचे अज्ञातांकडून अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी पंचवीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.
Mumbai Live : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हाशू आडवाणींच्या पुस्तकाचं प्रकाशनमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26 फेब्रुवारी 2025 रोजी चेंबूर येथील विवेकानंद एजुकेशन सोसायटीमध्ये स्वर्गीय श्री हाशू आडवाणी यांच्या भव्य शताब्दी सोहळ्यात सहभाग घेतला. या कार्यक्रमात हाशूजींच्या असामान्य कार्याचा गौरव करण्यात आला आणि समाज, शिक्षण व सार्वजनिक सेवेमधील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
Nagpur Live : जोगेश्वरी गुंफा परिसरात भेसळयुक्त मिठाईची विक्री!जोगेश्वरी पूर्वेतील प्रसिद्ध महादेव गुंफा परिसरात महाशिवरात्री निमित्त दरवर्षी जत्रेचे आयोजन केले जाते. या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यावेळी भाविक प्रसाद म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या मिठाईच्या दुकानातून पेढा आणि मावा मलाई खरेदी करून प्रसाद म्हणून वाटत असतात. मात्र, याच गर्दीचा गैरफायदा घेत या ठिकाणी असलेल्या मिठाईवाल्यांकडून निकृष्ट आणि भेसळयुक्त मिठाईची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून अत्यंत घाणेरड्या ठिकाणी मिठाई बनवतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे, यामुळं मिठाई विक्रेत्यांकडून कुठेतरी नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होतोय का? असा प्रश्न विचारला जात आहे.
Nagpur Live : कोरटकर प्रकरणी सकल मराठा समाज स्पष्ट करणार भूमिका; नागपूरमध्ये बैठकइतिहासकार इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात प्रशांत कोरटकर यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात पुढील भूमिका काय घ्यायची? यावर सकल मराठा संघाची बैठक. नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांच्या नेतृत्वात भोसला पॅलेसमध्ये झाली बैठक. सकल मराठा समाजाच प्रतिनिधींसह शिवप्रेमी या बैठकीत सहभागी झाले आहेत.
Mumbai Live: गोरेगावमध्ये बारमध्ये तरुणावर हल्ला; उपचारादरम्यान मृत्यूमुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद पडलेल्या धडकन बारमध्ये तरुणावर खुनी हल्ला करून आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी 307 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात रघु गौडा (४३ वर्षे) गंभीर जखमी झाला असून जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी अंधेरी पश्चिमेकडील लायन सिंग करतार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर वनराई पोलिसांनी 302 नुसार गुन्ह्याचे कलम वाढवले असून वनराई पोलीस फरार आरोपी देवराज गौडा याचा शोध घेत आहेत.
Pune Live: स्वारगेट बलात्कारप्रकरणी आरोपीचा शोध सुरू; पोलिसांकडून घराची झडती, महत्त्वाचे पुरावे जप्तस्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणी आरोपी घटना घडल्यानंतर शिरूरमधील आपल्या गावी गेल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून गुन्ह्यात वापरलेले शूज आणि कपडे जप्त केले आहेत. सध्या आरोपीचा तातडीने शोध घेतला जात आहे.
पीडितेला अत्याचाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे तिने सुरुवातीला कुणालाही माहिती दिली नव्हती.
Pune Live: स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणात काय कारवाई केली? अजित पवारांच्या पोलिसांना सुचनास्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणी पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात दिवसभरात करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सायंकाळी ७ वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांकडून आजच हा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवला जाणार असून, अजित पवार यांनाही याची माहिती दिली जाणार आहे.
Live: काँग्रेस पक्षाने २७-२८ फेब्रुवारी बोलावली आसाम आणि केरळमधील वरिष्ठ नेत्यांची बैठककाँग्रेस पक्षाने २७-२८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासमवेत आसाम आणि केरळमधील वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे.
Mumbai Live: गोरेगाव नेस्को संकुलात “भव्य-दिव्य महाशिवरात्री” महोत्सवाचे आयोजन; एकाच वेळी ३००० भाविकांनी केले ५ कोटी गणेश मंत्र पठणसंपूर्ण देशभरात आज महाशिवरात्री उत्सव साजरा केला जात आहे. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात देखील भव्य दिव्य महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य उपेंद्र महाराज यांच्या उपस्थितीत या महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी तीन हजाराहून अधिक भाविकांनी पाच कोटी गणेश मंत्र पठण केले. त्याचबरोबर महायज्ञाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
Mumbai Live: पुर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी ब्रिजवर दोन कारचा भीषण अपघात; तीन जण गंभीर जखमीपुर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी ब्रिजवर दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. यात तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून या प्रकरणाचा अधिक तपास विक्रोळी पोलिस ठाणे करत आहेत.
Solapur Live: श्रीशैल नगरातील मल्लिकार्जुन शिवालयात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी- महाशिवरात्रीनिमित्त श्रीशैल नगरातील मल्लिकार्जुन शिवालयात आज शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पहाटेपासूनच भाविकांची रांगा लागली आहेत.
- जुळे सोलापुरातील श्री मल्लिकार्जुन महादेवाचे हे एकमेव मंदिर असल्याने भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
- भाविकांनी गंगाजलाने शिवपूजन केले आणि मंदिरात विशेष पूजा विधी पार पडले. या दिवशी भाविकांना प्रसादाचे महावितरण करण्यात आले.
- सायंकाळी भजनसंध्या आणि प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, ज्यामुळे सणाचा आनंद अधिकच वाढला आहे.
Solapur Live: सोलापुरातील ओम गर्जना चौकात महिलांसाठी बाजरी भाकरी बनवण्याची स्पर्धा- सोलापुरातील ओम गर्जना चौकातील सिद्धेश्वर भोजनालयाच्या वतीने महिलांसाठी बाजरी भाकरी बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
- ही स्पर्धा १ मार्च (शनिवार) व २ मार्च (रविवार) या दोन दिवशी होणार आहे.
- स्पर्धेतील विजेत्यांना एकूण २१,००० रुपयांची रोख बक्षिसे प्रदान केली जातील,
- तसेच सहभागी महिलांना भेटवस्तूही देण्यात येणार आहेत.
Nashik Live: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत त्र्यंबकेश्वर, नाशिक येथील 2027 सिंहस्थ कुंभमेळा नियोजनावर बैठक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या नियोजनाबाबत बैठकीला सुरुवात
Live: महाकुंभाच्या शेवटच्या दिवशी भारतीय हवाई दलाचा भव्य हवाई शो, ४५ दिवसांच्या मेळ्याचा समारोप- महाकुंभाच्या शेवटच्या दिवशी भारतीय हवाई दलाने महाकुंभमेळा क्षेत्रावर हवाई शो केला आयोजित
- जो पौष पौर्णिमेला, १३ जानेवारी रोजी सुरू झालेल्या ४५ दिवसांच्या मेळ्याच्या भव्य समारोपाचे प्रतीक आहे.
विक्रोळी ब्रिजवर दोन कारचा भीषण अपघातमुंबईतल्या पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी ब्रिजवर दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. यात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात दोन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या भावाला घेतलं ताब्यातपुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी फरार झाला असून त्याच्या शोधासाठी आठ पथकं रवाना झाली आहेत. पोलिसांनी आरोपीच्या भावाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
पुणे अत्याचार प्रकरणी आरोपींच्या मागावर आठ पोलिस पथकंपुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपींच्या अटकेसाठी आठ पोलिसांची पथक रवाना झाली आहेत.
Nashik Live: काठे गल्ली सिग्नल परिसरातील वादग्रस्त धार्मिकस्थळाची सातबारा उताऱ्यावरील नोंद रद्द- अपर तहसीलदारांच्या प्रस्तावावर प्रांत अधिकाऱ्यांकडून निर्णय
- संबंधित जागेच्या सातबारा उताऱ्यावर महापालिकेची नोंद असताना मागील वर्षी अचानक धार्मिक स्थळाच्या ट्रस्टची नोंदणी झाल्याचं समोर
- अनावधानाने सातबारा उताऱ्यावर धार्मिक स्थळाच्या ट्रस्टची नोंद झाल्याची उपविभागीय अधिकाऱ्यांची कबुली
- सातबारा उताऱ्यावर संबंधित धार्मिक स्थळाच्या ट्रस्टची नोंद करणाऱ्या तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस
- चूक लक्षात येताच तातडीनं उपविभागीय अधिकाऱ्यांनी सातबारा उताऱ्यावरील संबंधित ट्रस्टची नोंद केली रद्द
- मागील शनिवारी हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाच्या इशारानंतर अनधिकृत धार्मिक स्थळाच्या अतिक्रमणावर करण्यात आली होती कारवाई
- या कारवाईमुळे शहरात निर्माण झालं होतं तणावाचं वातावरण
Pune Live: स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार- स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला आहे.
- सकाळी साडे पाच वाजता ही घटना घडली
Bihar Live :नितीश कुमार सरकार मंत्रिमंडळाचा आज विस्तारविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नितीश कुमार मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आज 6 आमदार मंत्रिमंडळाची शपथ घेतील.
Jalgaon Live : अस्थिविसर्जन करून परतताना तरुणांच्या गाडीला भीषण अपघातजळगावमधील असलेल्या तरुणांच्या वाहनाचा इंदूरमध्ये भीषण अपघात झाला. मध्यरात्री एकच्या सुमारास तरुणांच्या कारला समोरून येणाऱ्या क्रूझरने धडक दिली. सूरज झंवर हा तरुण आजोबांची अस्थितीविसर्जन करण्यासाठी हरिद्वारला गेला होता. तिथून परतताना ही घटना घडली.
Live : पंतप्रधान मोदी आज रशिया दौऱ्यावरपंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 9 मार्च रोजी मोदी रशियातील मॉस्को शहराला ते भेट देणार आहेत. रशियन युद्धाच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रेड परेडसाठी ते रशियाला जात असल्याचं समजतंय.
Mumbai Live : प्रशांत कोरटकर यांच्याविरोधात पवार गट आक्रमक ; घाटकोपरमध्ये आंदोलनइतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना मिळालेल्या धमकीमुळे पवार गट आक्रमक झाला असून घाटकोपरमध्ये प्रशांत कोरटकर यांच्याविरोधात आंदोलन केलं.
Maha Shivratri Live Updates: भीमाशंकर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शासकीय पूजाबारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शासकीय पूजा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली.
Beed Live Updates: संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीबीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती.
Nagpur Live : नागपूरमध्ये प्रशांत कोरटकरच्या घरासमोर आंदोलनछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक भाषा वापरल्याने तसेच इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी आंदोलकांनी त्यांच्या घरासमोर आंदोलकांनी आंदोलन केले.
Chhatrapati Sambhaji Nagar Live : घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांत फ्री –स्टाईल हाणामारीछत्रपती संभाजीनगरमधील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली. या दरम्यान दर्शनासाठी भाविकांचा गोंधळ देखील पाहायला मिळाला. दर्शना रांगेत पुढे जाण्यासाठी भाविकांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली.
Kirti Kiran Pujara LIVE : सीईओ कीर्तीकिरण पुजार यांची धाराशिव जिल्हाधिकारीपदी बदलीरत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांची पदोन्नतीने धाराशिव जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. ग्रामीण भागातील पर्यटन, बचत गट चळवळीला प्रोत्साहन यासह विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी दोन वर्षे महिला बचत गटांसाठी सिंधुरत्न योजनेतून हाऊसबोटी उपलब्ध करून देण्यात आली. सीईओ पुजार हे १ ऑक्टोबर २०२२ रोजी रत्नागिरीत रूजू झाले होते. दोन महिन्यांपूर्वी श्री. पुजार यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी अण्णासाहेब चव्हाण यांची नियुक्ती केल्याचे आदेशही प्राप्त झाले. ते आदेश बदलून चव्हाण यांना मुंबईत महात्मा फुले जनआरोग्य विभागात नियुक्ती दिली गेली होती.
Mahashivratri Raigad LIVE : महाशिवरात्रीनिमित्त रायगडमध्ये शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दीमहाशिवरात्रीच्या निमित्ताने रायगडमध्ये आज शंकराच्या मंदिरात मोठी गर्दी झालेली पहायला मिळत आहे. पहाटेपासूनच अभिषेक विधीवत पूजन सुरु करण्यात आला आहे. महाड शहरातील शिवकालीन वीरेश्वर मंदिरात आजपासून छबिना उत्सव म्हणजेच जत्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे.
Sadhguru Jaggi Vasudev LIVE : सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा योग केंद्रात आज महाशिवरात्री सोहळाकोईम्बतूर, तामिळनाडू : सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा योग केंद्रात महाशिवरात्री सोहळ्याची तयारी सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार येथे महाशिवरात्री सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
उत्तर प्रदेश : प्रयागराजमधील त्रिवेणी संगम येथे महाकुंभाच्या शेवटच्या 'स्नानात' सहभागी झालेल्या भाविकांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात असून महाकुंभमेळ्याचा आज समारोप होणार आहे.
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यावर्षी पासून दिला जाणार पहिला ‘महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार’ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘अनादी मी अनंत मी..’ या गीताला जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कामकाज मंत्री आशीष शेलार यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस समुद्र किनाऱ्यावरून केली.
Indrajit Sawant LIVE : इंद्रजित सावंत यांना धमकीप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलकोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीविरोधात येथील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांना चौकशीचे आदेश दिल्याने यंत्रणा गतिमान झाली. सावंत यांना मंगळवारी दुपारी पोलिस ठाण्यात बोलावून जबाब नोंदविण्यात आला. सायबर पोलिस ठाण्यामार्फत तांत्रिक मदत घेऊन गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.
Local Body Elections LIVE : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मार्चमध्ये होणार सुनावणीLatest Marathi Live Updates 26 February 2025 : आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली नाही. न्यायालयाने चार मार्च ही तात्पुरती तारीख दिल्याने निवडणूक आणखी लांबणीवर पडली आहे. तर, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीविरोधात कोल्हापुरात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शीख दंगलीवेळी पिता-पुत्राची हत्या केल्याचा काँग्रेसचे माजी खासदार सज्जनकुमार यांच्यावरील आरोप अखेर सिद्ध झाला असून राउज अव्हेन्यू न्यायालयाने त्यांना याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गेन बिटकॉईन गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नांदेड, पुणे, कोल्हापूरसह देशभरातील सुमारे ६० ठिकाणी एकाचवेळी छापे घातले. त्याचबरोबर राज्यात अजूनही काही भागांत थंडी कमी झालेली दिसत नाहीये. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..