Swargate Rape Case: पुणे बलात्कार प्रकरणी धक्कादायक अपडेट; पीडितेच्या वैद्यकीय अहवालातून गंभीर बाब आली समोर
Sarkarnama February 27, 2025 12:45 PM

Pune News : पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली. तरुणीवर अत्याचार करून आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणी तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आता या प्रकरणी आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पीडित तरुणीचा वैद्यकीय अहवाल समोर आला असून ससून रुग्णालयाने हा वैद्यकीय अहवाल पोलिसांकडे पाठवला आहे.

स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणच्या अहवालामधून धक्कादायक बाब समोर आली आहे, या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पीडितेवर एकदा नाही तर दोनदा लौंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. हा अहवाल ससून रुग्णालयानं पोलिसांकडे पाठवला आहे.

स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांची आठ पथके त्याचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणात स्वारगेट आगाराच्या नियंत्रक मोहिनी ढेरेंची देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.

दरम्यान, आता याप्रकरणी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पुण्यातील घटनेबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. काहीही करुन तो आरोपी सापडला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख ( सहाय्यक वाहतूक अधिक्षक ) आणि आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे असे आदेश उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ( प्रभारी ) विवेक भीमनराव यांना दिले आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर शिवेसना (Shivsena) ठाकरे गटाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून स्वारगेट बस स्थानकात घुसून तोडफोड करण्यात आली. सुरक्षा रक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्याकडून या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मागच्या बाजुला चार एसटी बस उभ्या आहेत, या लोकांनी त्या बसला लॉज बनवले आहेत. त्या बसमध्ये बेडशीट, रग महिला भगिनींच्या साड्या आणि कंडोम सापडले आहेत. तुम्ही जर स्वत: जाऊन मीडियानं या सर्व गोष्टी पाहिल्या तर एसटीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे कंडोम पडलेले तुम्हाला दिसतील. मग ही घटना लक्षात कशी आली नाही, असा सवाल वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.