Navi Mumbai News: वॉटरपार्क सहल जीवावर बेतली! शाळेच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याचा बळी?
Saam TV February 27, 2025 02:45 PM

Special Report: खोपोली नजिकच्या वॉटर पार्कला नवी मुंबईतील मनपा शाळा क्रमांक 76ची पिकनिक गेली होती.वॉटर पार्कला जायचं म्हणून आठवीत शिकणारा आयुष सिंगही आनंदात होता. पिकनिकला जायची सगळी तयारी त्यानं आदल्या रात्री करुन ठेवली.सकाळी लवकर उठला.मित्रांसोबत सहलीला जायचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

आय़ुषनं वॉटर पार्कमधील राईडवरुन धम्माल केली.संध्याकाळपर्यंत सगळं काही छान चाललं होतं.मात्र साडेपाचच्या सुमारास अचानक आयुषला त्रास झाला. त्याला उलटी झाली आणि तो बेशुद्ध झाला.अचानक आयुषला काय झालं म्हणून अवतीभोवती मित्रांनीही (Crowd)केली.तातडीनं आयुषला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी आयुषला मृत घोषित केलं.

मात्र खरा सवाल इथंच उपस्थित होतो.सरकारचे नियम डावलून महापालिकेच्या शाळेनं पिकनिक अडवेंचर पार्कला का नेली? २०१७ मधील शासकीय आदेशानुसार शालेय विद्यार्थ्यांच्या सहली वॉटरपार्कला नेण्यावर निर्बंध घालण्यात आलेत,त्यामुळे शाळेला वॉटर पार्कला सहल नेण्याची परवानगी कुणी दिली? हाच सवाल मनसे नेते गजानन काळे यांनीही उपस्थित करत शिक्षण विभागाला धारेवर धरलंय.

आयुषच्या मृत्यूला एकप्रकारे (School)प्रशासनचं जबाबदार असल्याचा आरोप संतप्त पालकांकडून केला जातोय. शिक्षण विभागाचे नियम धाब्यावर बसवून मुलांच्या जीवाशी खेळ कोण करतंय? मुळात शाळेनं विद्यार्थ्याची काळजी का घेतली नाही असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.