Maharashtra Politics News live : महाकुंभमेळ्यात भक्तांचा महापूर! दीड महिन्यात 65 कोटी लोकांचं स्नान
Sarkarnama February 27, 2025 05:45 PM
Mahakumbh 2025 : दीड महिन्यात 65 कोटी लोकांचं पवित्र स्नान

प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभमेळ्याचा काल रात्री महाशिवरात्रीच्या दिवशी समारोप झाला. या दीड महिन्याच्या कालावधीत पवित्रस्थान करण्यासाठी तब्बल 65 कोटी भाविक प्रयागराजमध्ये आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी जवळपास 81 लाख भाविकांनी स्नान केलं. स्नान करणाऱ्या भाविकांवर काल हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

Pune Swargate Bus Depot : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी अद्याप फरारच

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. या नराधमाला पकडण्यासाठी पोलिसांच्या आठ टीम कार्यरत आहेत. तर आरोपी दत्तात्रय गाडेशी संबंधित जवळपास दहा लोकांची पोलिसांनी चौकशी केली आहे. आरोपीचे आई-वडील आणि भावाला आज चौकशीसाठी बोलवल्याची माहिती आहे.

Nashik Guardian Minister Post : अखेर नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला

मागील अनेक दिवसांपासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत धुसफूस सुरू होती. अशातच आता दिल्लीतील वरीष्ठ नेत्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचं पालकत्व कोणालाही दिलं जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.