आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील नवव्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीतील पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे यजमान पाकिस्तान आणि बांगलादेशचं स्पर्धेतील आव्हान संपु्ष्ठात आलं आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना फक्त नि फक्त औपचारिकता आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा विजय मिळवून मोहिमेची सांगता करण्याचा प्रयत्न असणार आहे.
उभयसंघातील या सामन्याचं आयोजन हे रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला नियोजित वेळेनुसार 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात तर 2 वाजता टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र ओल्या खेळपट्टीमुळे टॉसला विलंब झाला आहे. ओल्या खेळपट्टीमुळे 1 तास प्रतिक्षा करण्यात आली. मात्र अद्याप टॉस होण्याची काही शक्यता नाहीत. त्यामुळे या सामन्याला अजून किती विलंब होऊ शकतो, याबाबत नक्की सांगता येणार नाही.
उभयसंघातील सामना हा पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे रद्द झाला, तर प्रत्येकी 1-1 गुण देण्यात येईल. मात्र असं होऊ नये, अशी दोन्ही संघांची इच्छा असेल. त्याचं कारण म्हणजे दोन्ही संघांचा या स्पर्धेतील हा शेवटचा सामना आहे. दोन्ही संघांना विजयाची चव चाखता आलेली नाही. त्यामुळे बांगलादेशचा जाता जाता विजयी होऊन मायदेशी परतण्याचा प्रयत्न असणार आहे. तर यजमान आणि गतविजेत्या पाकिस्तानसाठी विजयी होणं प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे आता या सामन्याबाबत काय अपडेट येते? याकडे दोन्ही संघांचं लक्ष असणार आहे.
पावसामुळे टॉसला विलंब
पाकिस्तान टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद, कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, उस्मान खान आणि फहीम अशरफ.
बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), तन्झिद हसन, मेहिदी हसन मिराझ, तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, नाहिद राणा, तन्झिम हसन साकिब, परवेझ होसैन, सोमोनम अहमद आणि इमोनम सरोद.