Sikandar: 'इंसाफ नहीं साफ करने आय हूँ...'; सलमान खानच्या 'सिकंदर'चा धमाकेदार टीझर रिलीझ
Saam TV February 27, 2025 10:45 PM

Sikandar: यावर्षी ईदच्या निमित्ताने सलमान खान त्याच्या सर्व चाहत्यांना ईदी म्हणून 'सिकंदर' हा चित्रपट भेट देणार आहे. त्याआधी भाईजानने या चित्राचा टीझर रिलीज केला आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे.

'गजनी' चित्रपटाचे दिग्दर्शक एआर मुरुगादोस दिग्दर्शित '' या चित्रपटात सलमानच्या सोबत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये भाईजानचा स्वॅग पाहायला मिळत आहे. या ईदला सलमान बॉक्स ऑफिसवर नक्कीच मोठी कमाई करेल यात काही शंका नाही.

सलमान खानच्या 'सिकंदर'चा टीझर

हा या चित्रपटाचा दुसरा टीझर व्हिडिओ आहे. याआधी डिसेंबर २०२४ मध्ये याचा पहीला टीझर रिलीज झाला होता, यामध्ये चाहत्यांना सलमान खूप आवडला होता. त्यात त्याचा एकच संवाद होता, हा टिझर देखील प्रेक्षकांना खूप आवडला होता.

शेवटचा 'टायगर ३' चित्रपटात दिसला होता. डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानंतर तो कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. त्यात, आता तो या चित्रपटातून काय जादू करणार हे लवकरच समजेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.