शाहिद आफ्रिदीला पीसीबी किती पेन्शन देते? आकडा ऐकून तुम्ही म्हणाल याच्यापेक्षा तर विनोद कांबळीला बरी मिळते
GH News February 27, 2025 11:14 PM

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वेगवेगळ्या देशांमधील क्रिकेट बोर्डाकडून आपल्या खेळाडूंना उदरनिर्वाहासाठी पेन्शन दिली जाते. पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आणि भारताचा विनोद कांबळी हे दोन असे खेळाडू आहेत. ज्या दोघांनी आपआपल्या देशासाठी क्रिकेट क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर आता शाहिद आफ्रिदीला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) कडून तर विनोद कांबळीला भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) कडून पेन्शन दिली जाते. जाणून घेऊयात या दोन दिग्गज खेळाडूंना किती पेन्शन मिळते ते.

शाहिद आफ्रिदीला किती पेन्शन मिळते?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून आपल्या निवृत्त झालेल्या क्रिकेट खेळाडूंना निवृत्तिवेतन मिळते. हे निवृत्ती वेतन त्यांनी देशासाठी किती टेस्ट सामने खेळले आहेत त्यावर अवलंबून आहे. शाहिद आफ्रिदीने आपल्या संपूर्ण करिअरमध्ये पाकिस्तानसाठी एकूण 27 टेस्ट मॅच खेळल्या आहेत ज्याच्या आधारावर पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून त्याला पेन्शन दिली जाते. पीसीबीकडून शाहिद आफ्रिदीला दर महिन्याला 1,54,000 रुपये मिळतात, ज्याची किंमत भारतीय चलनामध्ये 47,000 हजार रुपये एवढी आहे.

विनोद कांबळीला किती मिळते पेन्शन?

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) कडून देखील आपल्या माजी खेळाडूंना पेन्शन दिली जाते. विनोद कांबळीने आपल्या संपूर्ण करिअरमध्ये भारतासाठी एकूण 17 कसोटी सामने खेळले. ज्याच्या आधारावर त्याला बीसीसीआयकडून दर महिन्याला पेन्शन दिली जाते. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डकडून विनोद कांबळीला त्याच्या टेस्ट क्रिकेट सामन्यांच्या आधारावर दर महिन्याला 30,000 हजार रुपये एवढी पेन्शन मिळते.

शाहिद आफ्रिदीला पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून दर महिन्याला 47,000 हजार रुपये एवढी पेन्शन मिळते. तर विनोद कांबळीला भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून दर महिन्याला तीस हजार रुपये एवढी पेन्शन दिल्या जाते. दोघांच्या पेन्शनमध्ये केवळ सतरा हजार रुपयांचा फरक आहे. मात्र शाहिद आफ्रिदी हा विनोद कांबळीच्या तुलनेत आपल्या देशासाठी बराच काळ क्रिकेट खेळला. त्या अर्थाने पेन्शनचा हा आकडा फारच कमी वाटतो. कोणत्या खेळाडूला किती पेन्शन मिळणार हे त्याने खेळलेल्या कसोटी सामन्यावरून ठरवलं जातं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.