जालगावातील 2 शाळांत अक्षयऊर्जेचा वापर
esakal February 27, 2025 11:45 PM

rat२६p३५.jpg -
२५N४७८९१
दापोली ः जिल्हा परिषद आदर्श शाळा ब्राह्मणवाडी जालगांव येथे बसवण्यात आलेले सौरऊर्जेचे किट.
----
जालगावातील शाळेत अक्षयऊर्जेचा वापर
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २७ ः रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जालगाव आदर्श केंद्र शाळा नं. एक आणि जिल्हा परिषद आदर्श शाळा ब्राह्मणवाडी जालगांव या दोन शाळांमध्ये अक्षयऊर्जेचा वापर सुरू करण्यात आला आहे. या दोन्ही शाळांमध्ये सौरपॅनलच्या माध्यमातून प्रत्येक वर्गामध्ये पंखा आणि ट्यूब अशी दोन विजेची सयंत्रे ही सौरऊर्जेवर करण्यात आली आहेत. यामुळे अक्षयऊर्जेचा वापर करून वीज बचत करून वातावरण बदलाला सामोरे जाण्याचे कृतित्मक धडे विद्यार्थ्यांना शाळेतच आता गिरवले जाऊ लागले आहेत. शाळेतील दिलेले शिक्षण हे जीवनात अंगीकारण्याकरिताच माझी वसुंधरा अभियान सुरू असून, सर्व नागरिक आणि पालकांनी अक्षयऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन, या निमित्ताने माझी वसुंधरा अभियान आणि ग्रामपंचायत जालगावच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
---

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.