आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत आता दिवसेंदिवस रंगत पाहायला मिळत आहे. ए ग्रुपमधून टीम इंडिया आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यानंतर आता बी ग्रुपमधील 3 संघात उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. शुक्रवारी 28 फेब्रुवारीला बी ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये कोण पोहचणार? याबाबतचं चित्र जवळपास स्पष्ट होणार आहे. अफगाणिस्तान इंग्लंडला पराभूत केल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडणार आहे. अफगाणिस्तानने हा सामना जिंकला तर ते उपांत्य फेरीत पोहचतील. या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना शुक्रवारी 28 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 2 वाजता टॉस होईल.
अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
दरम्यान अफगाणिस्तान पॉइंट्स टेबलमध्ये 2 पॉइंट्ससह तिसर्या स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया प्रत्येकी 3-3 पॉइंट्ससह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. तर इंग्लंड चौथ्या आणि शेवटच्या स्थानी आहे. इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान हे संपुष्ठात आलं आहे.
ऑस्ट्रेलिया टीम : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशॅग्ने, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ॲलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ॲरॉन हार्डी, सीन ॲबॉट आणि सीन ॲबॉट.
अफगाणिस्तान संघ : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झाद्रान, सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नूर अहमद, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, इक्रम अलीखिल, नांगेलिया खरोटे आणि नावेद झाद्रान.