Viral Video: मुंबईतील भयान वास्तव! रेल्वे ट्रॅकमध्येच थाटला संसार; तिथेच झोपणं, खाणं अन् लहानग्याचं बागडणं, VIDEO व्हायरल
Saam TV February 28, 2025 02:45 AM

Viral Mumbai Video: मुंबई शहराला मायानगरी म्हणून ओळखले जाते. जिथे जगभरातील अनेक लोकं आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी येतात.मात्र, या शहरात टिकून राहण्यासाठी काहींना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशाच संघर्षमय वास्तवाचं दर्शन घडवणारा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लोकलचा मार्ग दिसत आहे.ज्या रेल्वे रुळाच्या मधोमध काही नागरिक दिसून येत आहे.ज्यात काही लहान मुलांचा समावेश आहे.काही व्यक्ती झोपलेले आहे तर काही जेवण बनवताना दिसत आहे.सर्व धक्कादायक प्रकार एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

सर्व व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.व्हिडिओ नक्की कधीचा आहे हे समजू शकलेले नाही,मात्र सध्या या व्हिडिओला लोकांनी हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळवून दिलेले आहे.ऐढवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

मुंबई रेल्वे रुळावरील ही परिस्थिती पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली,''मुंबई शहरात काहीही होऊ शकत''तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे,''मुंबई शहरात लोक जगण्यासाठी काहीही करतात'' तर काही यूजर्संनी कमेंट केली आहे,''जीवनाला घाबरत नाहीत'' तर काहींनी संतापजनक (reaction)केलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.