Latest Marathi News Updates : गृहराज्यमंत्र्यांनी केली स्वारगेट स्थानकात पाहाणी
esakal February 28, 2025 02:45 AM
गृहराज्यमंत्र्यांनी केली स्वारगेट स्थानकात पाहाणी

स्वारगेट स्थानकात एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट स्थानकात पाहाणी केली. त्यानंतर ते पोलिस आयुक्तालयाकडे रवान झाले.

पुणे पोलिस आयुक्त स्वारगेट बस स्थानकात दाखल

पुणे पोलिस आयुक्त स्वारगेट बस स्थानकामध्ये दाखल झाले आहेत. थोड्यात वेळात गृहराज्यमंत्री घटनास्थळी पोहोचणार आहेत. स्वारगेट बस स्थानकामध्ये एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडली होती.

Bangladesh Live Updates: विद्यार्थी आंदोलनातून नवीन राजकीय पक्षाची स्थापना

विद्यार्थी आंदोलनातून नवीन राजकीय पक्षाची स्थापना. गेल्या वर्षी तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना पदच्युत करण्यासाठी आघाडीवर असलेले विद्यार्थी २८ फेब्रुवारी रोजी नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत.

Kolhapur Live Updates: कोल्हापूर प्रवेशद्वाराच्या समोर असलेल्या एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह
  • कोल्हापूरच्या प्रवेशद्वारासमोरच एका तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

  • कोल्हापूर प्रवेशद्वाराच्या समोर असलेल्या एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह

  • रस्त्याच्या कडेलाच असलेल्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह

  • घटनास्थळी पोलीस दाखल

Sanjay Raut Live : गुंडांना सत्ताधारी पक्षाकडून अभय- संजय राऊत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्वारगेट बस स्थानकात अत्याचार प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. गुंडाना सत्ताधारी पक्षाकडून अभय असल्याने राज्यात अत्याचारांत वाढ झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Nashik Live : गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री

नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला असून भाजपचे गिरीश महाजन हे पालकमंत्री असतील अशी सुत्रांची माहिती आहे. शिंदे गटाचे दादा भुसे हे नाराज असल्याने पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Pune Live : पुण्यात कॅबचालकाकडून महिलेची छेडछाड

पुण्यात स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच कॅबचालकाकडून महिलेची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणीनगरमध्ये घडला.

स्वारगेट डेपोत घडलेली घटना दुर्दैवी, पुढील २-३ दिवसांत आरोपीला अटक केली जाईल - रूपाली चाकणकर

पुणे : पुण्यातील बलात्काराच्या घटनेवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, "स्वारगेट डेपोमध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पीडितेने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी त्वरित कारवाई केली. पुढील २-३ दिवसांत आरोपीला अटक केली जाईल."

Harshvardhan Sapkal LIVE : फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था ढासळली; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जोरदार टीका

मुंबई : पुण्यातील बलात्कार घटनेवरुन महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, "गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात महिलांच्या शोषणाच्या घटना सतत समोर येत आहेत. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. आम्ही पीडितेसोबत आहोत आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे."

India Fishermen LIVE : श्रीलंकेत तुरुंगात टाकलेल्या 27 भारतीय मच्छिमारांची सुटका

तामिळनाडू : श्रीलंकेत तुरुंगात टाकलेल्या २७ भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली असून आज ते चेन्नईत पोहोचले आहेत.

10th Exam LIVE : दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे

कोल्हापूर : अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा, यांसह विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार महाराष्ट्र राज्य विनाअनुदान शाळा कृती समितीने मागे घेतला. शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू करावे, असे आवाहन या समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी केले आहे.

Shiv Shakti Textile Stores : सुरतमधील शिवशक्ती टेक्सटाईल स्टोअर्सला लागली आग

गुजरात : सुरतमधील शिवशक्ती टेक्सटाईल स्टोअर्समध्ये लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत.

Kolhapur ST Corporation LIVE : कोल्हापुरातून कर्नाटकात अंशतः एसटी वाहतूक सुरू

कोल्हापूर : कोल्हापूर एसटी महामंडळाच्या चालकाला कर्नाटकात चित्रदुर्ग येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर बंद असलेली महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा आज काहीअंशी सुरू झाली. कोल्हापूर ते निपाणी, संकेश्वर या मार्गावर अडीचशे फेऱ्या झाल्या. येत्या दोन दिवसांत पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

Marathi Bhasha Gaurav Din 2025 : संपूर्ण महाराष्ट्रात आज मराठी भाषा गौरव दिन, विविध कार्यक्रमांचं आयोजन

Latest Marathi Live Updates 27 February 2025 : आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या स्वारगेट बसस्थानकात थांबलेल्या शिवशाही बसमध्ये नराधमाने एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (ता. २५) पहाटे ५.३० च्या सुमारास घडला. मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला लढविण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याची स्तुती करणाऱ्या एनआयटी- कलिकत येथील प्राध्यापिक डॉ. शाजिया यांची नियोजन आणि विकास विभागाच्या अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर राज्यात अजूनही काही भागांत थंडी कमी झालेली दिसत नाहीये. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.