Deer Rescue : पाण्याच्या शोधात असलेल्या एका हरणाचे प्राण गावकऱ्यांनी वाचवले, वन्य प्राण्याची सुरक्षा; वाऱ्यावर
esakal February 28, 2025 03:45 AM

ईस्लापुर : पाण्याच्या शोधात असलेल्या नर जातीचा हरीण खड्ड्यात पडल्याने दोरीच्या साह्याने कडी मेहनतीत घेत ईस्लापुर येथील गावकऱ्यांनी त्या नर जातीच्या हरणाचे प्राण जगदीप हानवते , विठ्ठल कदम , बालाजी पोहेकर , जगदीश आडे, वन कर्मचारी नितीन पवार, यानी वाचवले.

सध्या सर्वत्र भीषण पाणी टंचाईची समस्या चालू झाली असून नदी , नाले, हातपंप , बोअरवेल , आदिची पाण्याची पातळी खालावली असून त्यासोबतच जंगल भागात पाण्याचे साधन आटल्याने वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे त्यामुळे वन्यप्राणी हे वस्तीकडे धाव घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

आज दि २६ रोजी इस्लापूर जवळील सतीदेवी मंदिराच्या समोर एका संस्थेच्या शाळेचे बांधकाम चालू आहे . नर जातीचा हरीण बांधकामाच्या खड्ड्यात पडल्याची माहिती जवळच असलेल्या गावकऱ्यांना दिली . असता गावकऱ्यांनी कडी मेहनत करून दोरीच्या सहाय्याने त्या नर जातीच्या हरीनाला बाहेर काढण्यात यश मिळाले परंतु वरून खड्ड्यात पडल्यामुळे त्या हरीनला जब्बर मार लागल्याचे कळाले परंतु पशुवैद्यकीय दवाखान्यात सुट्टी असल्यामुळे त्या हरणांना वेळेवर उपचार न मिळाल्याची माहिती मिळाली आहे.

वन विभागाचे कर्मचारी नसल्यामुळे नितीन पवार , लक्ष्मण मेटकर, उत्तम जाधव , या वन मजुरानी त्या अपघाती हरणाची देखरेख करावी लागली संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खड्यात पडलेल्या हरणाला उपचार मिळाला नसल्याची माहीती मिळाली त्या वन विभागाच्या विचारले असता वरीष्ठ कर्मचारी कोणीच नसल्याची माहिती मिळाली. दि . २५ फेब्रुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास खड्यात पडलेल्या हरणाला आज दि . २६ रोजी पाच वाजे पर्यंत उपचार मिळाला नसल्याची धका दायक माहीती मिळाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.