संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या 58 व्या सत्राच्या सातव्या बैठकीत भारताने पाकिस्तानवर जोरदार टीका केली. IFS Kshitij Tyagi
पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उचलल्यानंतर भारतीय राजदूत क्षितिज त्यागी यांनी, पलटवार करत पाकिस्तान म्हणजे 'अयशस्वी देश' असल्याचे सुनावले
पाकिस्तान आजही आंतरराष्ट्रीय मदतीवर असणारा देश असून यांचे नेतेच लष्करी-दहशतवादी परीसरात खोटे पसरवतात असल्याचे क्षितिज यांनी म्हटले. यामुळे आता त्यांची चर्चा होत आहे.
क्षितिज त्यागी भारतीय परराष्ट्र सेवेत येण्यापूर्वी अभियंता होते. त्यांचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाले आहे.
तसेच येथेच त्यांनी थर्मल एनर्जी आणि एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंगमध्ये एम.टेक केल्यानंतर जोन्स लँग लासेल नावाच्या रिअल इस्टेट कंपनीत तीन वर्ष काम केलं
यादरम्यान 2010 साली ते अक्षय ऊर्जा मंत्रालयात शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. यावेळीच त्यांना प्रशासकीय सेवेत येण्याची प्रेरणा मिळाली
2012 मध्ये क्षितिज त्यागींनी भारतीय नागरी सेवा परीक्षा दिली ज्यात ते उत्तीर्ण केली. यात त्यांची निवड आयएफएस अधिकारी म्हणून झाली.
आयएफएस अधिकारी म्हणून त्यांनी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयात काम पाहिले आहे.