अनेक देशांमध्ये देशात वेश्या व्यवसायाला कायदेशीर परवानगी नाही. पण जगातील काही देश असे आहेत, जेथे देशात वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता आहे. जगातील जवळपास 49 देशांमध्ये वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता आहे. पण असं असताना देखील काही महिलांना इच्छा नसताना वेश्या व्यवसायात ढकललं जातं. वेश्या व्यवसाय हा जगातील सर्वात जुना व्यवसाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वेश्या व्यवसाय अनेक देशांमध्ये सुरु आहे. तर काही देशांमध्ये वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता आहे. यामध्ये पैशांच्या बदल्यात महिलांना पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतात.
अनेक जण वेश्या व्यवसायाकडे चुकीचा व्यवसाय म्हणून पाहतात. यामध्ये सहभागी लोकांना शारीरिक शोषणाला सामोरं जावं लागतं तर कधी बळजबरीने काम करावे लागतं. जगात जवळपास 49 देशांमध्ये वेश्या व्यवसायाला कायदेशीर परवानगी आहे. बांग्लादेशात देखील वेश्या व्यवसायाला कायदेशीर परवानगी देण्यात आली आहे.
भारतात वेश्या व्यवसाय बेकायदेशीर आहे, परंतु शेजारच्या बांगलादेशात वेश्या व्यवसाय सरकारी नियमांनुसार कायदेशीर आहे. बांगलादेशात वेश्या व्यवसाय करण्यासाठी सुरुवातील नोंदनी करावी लागते. शिवाय सोबतच स्वतःच्या सहमतीने व्यवसाय करत आहे… अस लिखीत स्वरुपात द्याव लागतं. कारण ज्यांच्याकेडे कोणता उद्योग किंवा नोकरी नसेल अशा महिला बांगलादेशात वेश्या व्यवसाय करु शकतात.
रिपोर्टनुसार, बांग्लादेशात जवळपास 2 लाख महिला वेश्या व्यवसाय करतात. दौलतदिया हे तिथले सर्वात मोठं वेश्या व्यवसायाचं क्षेत्र आहे, जिथे सुमारे 1,300 महिला वेश्या व्यवसायात आहेत. येथे व्यवसाय कायदेशीर असला तरी बांगलादेशच्या राज्यघटनेत जुगार आणि वेश्याव्यवसायाला बंदी आहे. मुलींना बळजबरी वेश्याव्यवसाय करायला भाग पाडणे, जबरदस्ती करणे आणि परवान्याशिवाय वेश्या व्यवसाय करणं बेकायदेशीर आहे.
रिपोर्टनुसार, 2000 पासून बांग्लादेशात वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता आहे. पण यामध्ये अनेकांना इच्छे विरोधातात ढकललं जातं. अनेक गरीब आई – वडील स्वतःच्या मुलींना कमी पैशांमध्ये विकतात. काही मुलींना लग्नाचे खोटे आश्वासन देऊन फसवले जाते. सुमारे 29 हजार अल्पवयीन मुली या दलदलीत अडकल्या आहेत.
बांग्लादेशच नाही तर, अन्य देशांमध्ये देखील वेश्या व्यवसायाला कायदेशीर परवानगी आहे. ऑस्ट्रियामध्ये वेश्या व्यवसाय कायदेशीर आहे आणि सरकार महिलांच्या आरोग्याची काळजी घेतं. या देशात 19 वर्षांखालील मुलींना हे काम करण्याची परवानगी नाही आणि त्यांना कर भरावा लागतो. ऑस्ट्रेलियातील काही राज्यात वेश्या व्यवसायाला परवानगी आहे, तर काही राज्यांमध्ये नाही.
बेल्जियममध्ये सेक्स वर्क ही एक कला मानली जाते आणि ज्यासाठी महिलांना परवाना दिला जातो. 2003 पासून न्यूझीलंडमध्ये वेश्या व्यवसाय कायदेशीर आहे आणि तेथील सेक्स वर्कर्सना इतर नोकऱ्यांप्रमाणेच सुविधा मिळतात.