Mumbai News: नोकरीचा दिवस अखेरचा ठरला; धावत्या लोकलमधून पडून डोंबिवलीच्या तरुणाचा मृत्यू
Saam TV April 04, 2025 02:45 AM

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

लोकलमधील प्रचंड गर्दीने आणखी एका तरूणाचा बळी घेतला आहे. नोकरीसाठी डोंबिवलीहून सीसीएसएमटीला जाणाऱ्या तरूणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. तरूण दरवाज्यावर उभा होता. धावत्या लोकलमधून तोल गेला आणि तरूण खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कोपर ते दिवा स्थानकादरम्यान घडली आहे. धावत्या लोकलमधून पडून तरूणाचा जागीच मृत्यू झाल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे.

रुपेश गुजर मृत तरूणाचे आहे. तो येथील तुकारामनगरमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. आज सकाळी साडे आठ ते नऊच्या सुमारास तरूणाने सीएसएमटीची लोकल पकडली. तो मुंबईला कामानिमित्त जात होता. यादरम्यान, लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. तरूण दरवाज्यावर लटकलेल्या अवस्थेत उभा होता. गर्दीमुळे तो लोकलच्या दरवाज्यावरून खाली पडला.

कोपर ते दिवा स्थानकादरम्यान तरूण धावत्या लोकलमधून खाली पडला. त्याला गंभीर दुखापत झाली. तरूणाला तातडीने रुग्णालयात करण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपीची ओळख पटवून घेतली. या प्रकरणानंतर त्याच्या कुटुंबाला माहिती दिली. या घटनेमुळे पुन्हा एकदा लोकलमधील गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लाखो प्रवाशांसाठी लोकल रेल्वे ही जीवनवाहिनी आहे. मात्र, दररोज होणाऱ्या गर्दीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. प्रशासन याकडे कधी लक्ष देणार? गर्दी नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना केव्हा होणार? असे संतप्त प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. रेल्वे प्रशासनाने या वाढत्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.