मी 22 व्या वर्षी सफारी गाडीतून फिरायचो, मला चोऱ्या-माऱ्या करायची गरज नाही; पळडकरांचा पलटवार
Marathi April 17, 2025 10:25 PM

सोलापूर : पुण्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या धनगरी नाद कार्यक्रमावरुन आता वाद निर्माण झाला आहे. कारण, या कार्यक्रमासाठी खास गृहमंत्री अमित शाह यांना निंमत्रण देणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या कार्यक्रमास बोलवणार नसल्याचे म्हटले. त्यावरुन, वाद सुरू झाला असून राष्ट्रवादी कॉंग्रेस (एनसीपी)अजित पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चवन यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली होती. ते शेख चिल्ली असल्याचे सूरज चव्हाण यांनी म्हटलं. आता, गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी सूरज चव्हाण यांच्यावर पलटवार केला आहे. या बिनडोक लोकांना माहिती नाही मी 22 व्या वर्षीपासून सफारी गाडीतून फिरतो, तेव्हा तुम्हाला चड्डी पण नीट घालता येतं नव्हती, अशा शब्दात पडळकरांनी पलटवार केला आहे.

चोरी, दरोडे याचा उल्लेख करत सूरज चव्हाण यांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं होतं. स्वतःच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे अजितदादांना कार्यक्रमाला बोलवण्याची हिंमत गोपीचंद पडळकरांनी केली नसावी, असा टोला सूरज चव्हाण यांनी लगावला होता. त्यावरुन, आता पडळकरांनी जशास तसे उत्तर दिलं आहे. हे मला दरोडेखोर म्हणतात, मी आजपर्यंत कधी या विषयावर बोललो नाही, पण हे सगळ राष्ट्रवादीचेच काम आहे. माझ्यावर मंगळसूत्र चोरीचा आरोप केला त्यावेळी त्यांच्या अपक्ष आमदार 2009 साली विधानपरिषदेत दोन अडीच हजार मतांनी पडला. मेलेल्या माणसांबद्दल बोलू नये पण त्यावेळेसचे गृहमंत्री आर आर आबा पाटील यांचा तो एकदम जवळचा व्यक्ती होता, मानस बंधू होते. ज्या लग्नाच्या लग्नपत्रिकेत माझा उल्लेख प्रमुख पाहुणा म्हणून होता, त्या लग्नात भांडण झाली तेव्हा मी तिथं उपस्थित नव्हतो. तरी देखील माझ्यावर केस टाकण्यात आली, हे राष्ट्रवादीचेच पाप आहे, असा इतिहास पडळकरांनी सांगितला. तर, या बिनडोक लोकांना माहिती नाही मी 22 व्या वर्षीपासून सफारी गाडीतून फिरतो, तेव्हा तुम्हाला चड्डी पण नीट घालता येतं नव्हती, असे म्हणत सूरज चव्हाण यांच्या टीकेवर पलटवार केला आहे.

चोऱ्या-माऱ्या करायची गरज नाही

मी धनगराचा पोरगा आहे, मला असल्या चोऱ्या माऱ्या करायची गरज नाही. प्रस्तापित व्यवस्थेच्या विरोधात जेव्हा मी बोलतो तेव्हा पोलीस, तहसीलदार असे प्रशासन वापरण्याशिवाय यांच्याकडे पर्याय नसतो. कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा आमचा विषय आहे, आम्ही ठरवू काय करायचं ते. तुमचे एवढे कार्यक्रम होतात आम्ही बोलतो का? हा समाजाचा विषय आहे, समाजाला वाटलं तुम्हाला बोलवावं तर तुम्हाला पण बोलवू, असेही पडळकर यांनी म्हटले.

सूरज चव्हाण यांची बोचरी टीका

गोपीचंद पडळकर हा शेखचिल्ली माणूस आहे. जसा शेखचिल्ली फांदी कापताना तुटायचा बाजूने बसून स्वतःच झाडावरून पडला होता, तसा हा शेखचिल्ली महायुतील्या नेत्यांवर बोलून स्वतःची राजकीय फांदी कापून घेतोय. या शेखचिल्लीला माहित आहे की, पवारांना विरोध केला तरचं राजकीय जिवंत राहू शकतो. पवारांशिवाय या शेखचिल्लीची मार्केट किंमत झिरो आहे, अशी टीका सूरज चव्हाण यांनी केली होती. तसेच, अजित दादा पवार यांनी अनेक भाषणामध्ये अनेकवेळा सांगितले आहे. पक्षामध्ये प्रवेश देताना किंवा एखाद्याच्या कार्यक्रमाला जाताना समाजात त्याची प्रतिमा चांगली असावी, राजकीय पार्श्वभूमी चोरी, दरोडेखोरीची नसावी. स्वतःच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे अजितदादांना कार्यक्रमाला बोलवण्याची हिंमत गोपीचंद पडळकरांनी केली नसावी, असा टोलाही सूरज चव्हाण यांनी लगावला होता.

हेही वाचा

महेश मांजरेकरांना जीवनगौरव, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वे अन् भीमराव पांचाळांनाही पुरस्कार जाहीर

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.