Dr Shirish Valsangkar : धक्कादायक! महाराष्ट्रातील प्रसिद्ध न्युरोसर्जनने गोळी झाडत संपवलं आयुष्य, घटनेने खळबळ
Saam TV April 19, 2025 08:45 AM

महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रासाठी धक्कादायक बातमी हाती आली आहे. प्रसिद्ध मेंदू विकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केली आहे. वळसंगकर यांनी स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवल आहे. वळसंगकर यांच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी रात्री साडेआठच्या दरम्यान सात रस्ता परिसरातील सोनामाता शाळेच्या शेजारी असलेल्या बंगल्यात स्वत:वर गोळी झाडली. या घटनेला सदर बाजार पोलिसातील सूत्रांनी याला दुजारा दिला आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्येमुळे ते राहत असलेल्या परिसरात खळबळ उडालीये.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. वळसंगकर यांनी आपल्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्याच अवस्थेत कुटुंबीयांनी तातडीने त्यांच्या स्वतःच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांना मोदी स्मशानभूमी जवळील वळसंगकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

रुग्णालय परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे. वळसंगकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ. वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याची अधिक माहिती पोलीस घेत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.