छोट्या पडद्यावर लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार पॅरॅव्ह वाहिनी नेहमीच नवनवीन विषयावरील कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते. आता स्टार प्रवाहवर 'कोण होतीस तू काय झालीस तू' ही मालिका नव्याने सुरू होणार आहे. या मालिकेतही जयदीप आणि गौरीची जोडी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव दिसणार आहेत. यावेळेस ते यश आणि कावेरीच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता त्या दोघांनी या मालिकेतील कथानकावर भाष्य केलंय.
आतापर्यंत ‘’ या मालिकेचे दोन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यातून मालिकेच्या कथानकाचा अंदाज प्रेक्षकांनी लावलाय. मात्र आता अल्ट्रा मराठी बझ'ला दिलेल्या मुलाखतीत मंदार आणि गिरीजा यांनी या मालिकेबद्दल सांगितलं आहे. या मालिकेच्या स्टारकास्टबद्दल बोलताना गिरीजा म्हणाली, 'मला माहितीच नव्हतं की, आम्ही एकत्र हा शो करतोय. आधी मी मीटिंग वगैरे करून आले होते. त्यानंतर मग इव्हेंट होता. त्यावेळी मंदारने मला स्वत:हून सांगितलं तुला माहितीये ना आपण हा शो करतोय. तेव्हा मी स्वत:च थक्क झाले होते.'
तरबद्दल बोलताना मंदार म्हणाला, 'ही मालिका आमच्या आधीच्या मालिकेपेक्षा खूप जास्त उत्सुकता वाढवणारी आहे. जेव्हा प्रोमो आला तेव्हा मलाही वाटलं होतं की, अरे आता कावेरी मुलाला घेऊन घरी येणार मग, सर्वांना गोष्टी कळणार… हे एवढं सोपं आहे. प्रेक्षकांना पण कथानक समजेल वगैरे असे प्रश्न आम्हाला सुद्धा पडले होते. यात काय ड्रामा आहे? पण, मी तुम्हाला सांगतो ड्रामा हा खऱ्या अर्थाने आताच सुरू होणार आहे. प्रेक्षकांना प्रोमोमध्ये जी परिस्थिती पाहायला मिळाली, ती नेमकी का घडलीये? दोन पात्रांमध्ये नेमके वाद काय आहेत?'
काय आहे मालिकेतला ट्विस्ट?तो पुढे म्हणाला, 'प्रोमोत दाखवलंय त्याप्रमाणे कावेरी मुलाला घेऊन घरी आलेली आहे पण, ते बाळ तिचं नसतं तिच्या मोठ्या बहिणीचं असतं. त्यामुळे घरात सर्वांना वाटतंय की, कावेरीच या घरची सून आणि माझी वहिनी आहे. पण, मला माहितीये ही माझी वहिनी नाहीये. कारण, यशने त्याच्या वहिनीला पाहिलेलं असतं. मग, ही नेमकी कोण आहे याचा शोध यश घेणार आहे. मालिका जशी पुढे जाईल, त्यानंतर हळुहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. जेवढा प्रोमो सोपा दिसतोय, तेवढा नाहीये.'