BJP President: भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत नवा ट्विस्ट;  दक्षिण भारतातून नव्या नावाची चर्चा 
News Update April 20, 2025 08:24 PM

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाला लवकरच नवीन राष्ट्रीय अध्यक्षाबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची घोषणा होईल, अशी चर्चा होती. पण राष्ट्रीय अध्यक्षाची निवड झालेली नाही. यानंतर आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन अध्यक्षांची घोषणा होऊ शकते. याबाबत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यात नव्याने चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्यात भाजप आणि आरएसएस मध्ये असलेले मतभेद दूर करून या नावाची घोषणा केली जाईल, असं अंतर्गत सुत्रांनी सांगितलं आहे.

संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे या आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यत ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतील. यापूर्वी, ३० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती आणि भागवत यांची भेट घेतली होती, परंतु त्यावेळी कोणत्याही नावावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीला उशीर झाला. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत आतापर्यंत अनेकांची नावे समोर आली. अशात आता पुन्हा नवीन नावांची चर्चा सुरू झाली आहे.

Sangram Thopte: काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेसनेच आणली; संग्राम थोपटे ‘या’ दिवशी करणार भाजपमध्ये प्रवेश

सी.टी. रवी
बी.एल. समाधान
मनोज सिन्हा
प्रल्हाद जोशी
धर्मेंद्र प्रधान
भूपेंद्र यादव

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी.टी. रवी हे सर्वात प्रबळ दावेदार मानले जातात. ते केवळ कर्नाटकचेच नाही तर बऱ्याच काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही जोडले गेले आहेत. आक्रमक राजकारण आणि संघटनात्मक कौशल्यासाठी ओळखले जाणारे सी.टी. रवी हे भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस देखील राहिले आहेत.

यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना त्यांच्या आवडत्या नेत्याला राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची इच्छा आहे. पण आरएसएसला रबर स्टॅम्प अध्यक्षाऐवजी एका मजबूत आणि अनुभवी संघटकाला पुढे आणायचे आहे. यावेळीही संघ पिढीजात बदलावर भर देत आहे, जसे २०१० मध्ये नितीन गडकरी यांच्या काळात झाले होते.

Jammu-Kashmir News: जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलन; रामबनमध्ये पूरसदृश परिस्थिती, ३ जणांचा मृत्यू

पुढचा राष्ट्रपती दक्षिण भारतातील असू शकतो का?

भाजपच्या रणनीतीनुसार, यावेळी पक्षाध्यक्ष दक्षिण भारतातील देखील असू शकतो. बीएल संतोष आणि सीटी रवी, दोघेही कर्नाटकचे आहेत आणि आरएसएस पार्श्वभूमीचे आहेत. याद्वारे पक्षाला दक्षिण भारतात आपली मुळे आणखी मजबूत करायची आहेत.

धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादवही शर्यतीत

निवडणूक रणनीतीत तज्ज्ञ मानले जाणारे आणि संघाशी दीर्घकाळ जोडलेले धर्मेंद्र प्रधान अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. त्याच वेळी, पर्यावरण मंत्री असलेले आणि अनेक निवडणुकांमध्ये भाजपला विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भूपेंद्र यादव यांचा दावाही मजबूत मानला जातो. तथापि, भाजप नेहमीच अनपेक्षित निर्णयांसाठी ओळखला जातो. पक्ष अशा एका चेहऱ्याला पुढे आणण्याची शक्यता आहे ज्याचे नाव सध्या चर्चेतही नाही

 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.