जगभरातील प्रेरणादायी व्यक्तिमत्वं त्यांच्या आचरणातून, कृतीतून सहज सोपे पण महत्त्वाचे संदेश देत असतात. चला, वाचूया!
हाती घेतलेली गोष्ट पूर्ण होणारच हे आधी ठरवा, तरच त्या गोष्टी पूर्ण करण्याचा मार्ग सापडेल
- अब्राहम लिंकन
आयुष्य जगण्याची संधी एकदाच मिळते. ते चांगल्या पद्धतीने जगले, तर एकदा मिळालेली ही संधीही पुरेशी असते.
- मे वेस्ट, नाटककार
अंधार अंधाराला दूर करू शकत नाही; प्रकाशच ते करू शकतो. त्याप्रमाणे तिरस्कार तिरस्काराला दूर करू शकत नाही; प्रेमच तो दूर करू शकतो.
- मार्टिन ल्यूथर किंग
कोणत्याही गोष्टीची याचना करू नका, परतफेडीची अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला जे द्यायचे असेल, ते देऊन टाका. तुम्हाला ते परत मिळाल्याशिवाय राहणार नाही.
- स्वामी विवेकानंद
कर्माला घाबरणाऱ्या माणसांच्या जगण्याला काहीही अर्थ नाही.
- साने गुरुजी
आयुष्यात अनेक नकार येतील; पण ते नकार म्हणजेच अंतिम उत्तर आहे, असे कधीही समजू नका.
- मार्शा आयव्हिन्स, अंतराळवीर
शुद्ध निरपेक्ष आनंद हाच कोणत्याही कलेचा उद्देश आहे व तेच तिचे फळ आहे.
- न. चिं. केळकर, साहित्यिक