Tejaswi Kalsekar of ‘Aapla Mahanagar’ elected as Vice President of Sindhudurg City Headquarters Journalists’ Association
Marathi April 22, 2025 10:37 PM


सिंधुदुर्गनगरी मुख्यालय पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी लवू म्हाडेश्वर, उपाध्यक्षपदी ‘आपलं महानगर’च्या तेजस्वी काळसेकर यांची निवड करण्यात आली. तर, सचिव दत्तप्रसाद वालावलकर, सहसचिव सतीश हरमलकर आणि खजिनदारपदी गिरीश परय यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गनगरी मुख्यालय पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी लवू म्हाडेश्वर, उपाध्यक्षपदी ‘आपलं महानगर’च्या तेजस्वी काळसेकर यांची निवड करण्यात आली. तर, सचिव दत्तप्रसाद वालावलकर, सहसचिव सतीश हरमलकर आणि खजिनदारपदी गिरीश परय यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक बंटी केनवडेकर आणि अमित खोत यांनी या कार्यकारिणीची घोषणा केली. (Tejaswi Kalsekar of ‘Aapla Mahanagar’ elected as Vice President of Sindhudurg City Headquarters Journalists’ Association)

जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या मुख्यालय पत्रकार समितीसह अन्य आठ तालुका पत्रकार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जिल्हा पत्रकार संधाने जाहीर केला आहे. त्यानुसार ही निवड प्रक्रिया घेण्यात आली. प्रतिष्ठित अशा सिंधुदुर्गनगरी मुख्यालय पत्रकार समितीच्या निवडीने या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. मुख्यालय पत्रकार समितीच्या निवडीसाठी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बंटी केनवडेकर आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमित खोत यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या निवडणूक निरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.

हेही वाचा – Thackeray Vs Mahayuti : शिक्षक गणवेशाच्या ‘टेंडरबाजीत’ दलाली खाण्याची स्पर्धा लागेल, ठाकरेंचा आरोप

सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवनाच्या सभागृहात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. संपूर्ण कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. अन्य कार्यकारिणी सदस्य म्हणून गणेश जेठे, संजय वालावलकर, संदीप गावडे, बाळ खडपकर, देवयानी वरसकर, नंदकुमार आयरे, विनोद दळवी, मनोज वारंग, विनोद परब यांची निवड घोषित करण्यात आली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर घेण्यात आलेली पहिलीच निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले, मावळते अध्यक्ष संदीप गावडे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबाबत मुख्यालय पत्रकार समितीने प्रशंसा केली. तर हे सांघीक कामाचे यश असल्याचे सांगत संदीप गावडे यांनी सर्वांचे आभार मानले व नूतन कार्यकारिणीला पुढील चांगल्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – Rajkot Shivaji Maharaj Statue : ‘चांगल्या’ हातांनी अनावरण व्हावे, रोहिणी खडसेंचा भाजपाला टोला


Edited by Manoj S. Joshi



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.