तळेगाव दाभाडे, ता.१३ ः कामशेत येथील श्री आनंदराम पन्नालाल भटेवरा जैन इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १५ वर्षांच्या परंपरेप्रमाणे शंभर टक्के लागला. पलक गदिया (९३.२०) प्राची पांदे (९१.६०) आणि संदीप रोटोगण, गायत्री रॉय (दोघेही ९०.८०) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविले. मुख्याध्यापिका संगीता मनोज यांनी विषय शिक्षकांना मार्गदर्शन केले. शाळेचे संचालक मंडळाने विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.